pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

दादा पाटील महाविद्यालयात निर्भय कन्या अभियान योजनेअंतर्गत व्याख्यान संपन्न

Samrudhakarjat
4 6 5 9 7 0

महाविद्यालयीन विद्यार्थिनींमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, त्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याबाबत योग्य मार्गदर्शन करणे तसेच निर्भय कन्या अभियानाच्या माध्यमातून आत्मविश्वास वाढवणे या उद्देशातून निर्भय कन्या अभियान योजनेअंतर्गत व्याख्यान संपन्न झाले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणेच्या विद्यार्थी विकास मंडळ आणि दादा पाटील महाविद्यालय, कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने निर्भय कन्या अभियान योजना अंतर्गत “महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे स्वास्थ्य” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

सदर व्याख्यानासाठी उपस्थित प्रमुख वक्त्या डॉ. जयश्री चंद्रशेखर मुळे यांनी विद्यार्थिनींना आरोग्याचे महत्त्व, आहार-विहार, मानसिक तणाव, स्वच्छता, तसेच महिलांच्या आरोग्याशी संबंधित विविध समस्या व त्यावरील उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. 

प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनस्पती विभागाच्या विभाग प्रमुख प्रा. डॉ. संगीता कुलकर्णी होत्या. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. 

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी विकास मंडळाचे समन्वयक प्रा. सागर शिंदे व सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सागर शिंदे यांनी तर आभार डॉ. एन. एम. चव्हाण यांनी मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker