महात्मा गांधी विद्यालय, कर्जत येथील विद्यार्थ्यांचे सातारा येथे”छावा नृत्य” सादरीकरण उत्स्फूर्तपणे संपन्न

कर्जत : दरवर्षीप्रमाणे यंदाही कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पुण्यतिथीनिमित्ताने रयत शिक्षण संस्थेच्या वतीने ७ व ८ मे रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानुसार उत्तर विभाग, अहिल्यानगर अंतर्गत येणाऱ्या महात्मा गांधी विद्यालय, कर्जत येथील विद्यार्थ्यांनी सातारा येथील कर्मवीर समाधी परिसरात ७ मे रोजी विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
या कार्यक्रमात “छावा नृत्य” सादर करण्यात आले. यामध्ये विद्यालयातील इयत्ता चौथी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. छत्रपती संभाजीराजे आणि कवी कलश यांच्या भूमिकांपासून ते संपूर्ण छावा नृत्य सादरीकरण पर्यंत विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे आपली कला सादर केली.
या सादरीकरणामध्ये विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक श्री. बेद्रे जे.आर., श्री. जाधव एस.एस., श्री. सोनवणे ए.पी., श्रीम. जाधव जे.व्ही. मॅडम आणि तंत्रस्नेही शिक्षक श्री. गांगर्डे आर.एस. यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक चौरे साहेब यांचेही विशेष मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या उत्तम सादरीकरणाची प्रशंसा संस्थेचे माननीय सहसचिव पवार बी.एन. साहेब, विभागीय अधिकारी बोडखे साहेब व इतर मान्यवरांनी केली. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि सांस्कृतिक जाणीव वृद्धिंगत करणाऱ्या या कार्यक्रमामुळे सर्वत्र गौरवाचे वातावरण निर्माण झाले आहे.