राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राशीन येथील संस्कार वस्तीगृहातील अनाथ मुलांना भोजन व कपडे वाटप.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी. :- मुलुख मैदानी तोफ म्हणून नेहमी चर्चेत असणारे व महाराष्ट्रभर ओळख निर्माण केलेले तसेच आपल्या भाषण शैलीतून भल्या भल्या राजकीय मातब्बर नेत्यांना घाम फोडणारे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नूतन तालुकाध्यक्ष सचिन सटाले यांच्या पुढाकाराने व इतर मनसे पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने १४ जून रोजी राशीन येथील संस्कार निवासी वस्तीग्रहातील गरीब, गरजू, अनाथ, मुलांना कपडे वाटप करून भोजन ही देण्यात आले. यावेळी सर्व दानशूर दात्यांचे संस्कार वस्तीग्रहाचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र आढाव यांनी आभार मानले.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष सचिन सटाले, उपाध्यक्ष आबासाहेब उघडे, राशिन शहर उपाध्यक्ष सचिन साळवे, व मनसेचे तालुक्यातून इतर पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.