
कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्याला फार मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. प्राचीन कालखंडापासून ते आजतागायत विविध ऐतिहासिक वास्तू व घटना यानी कर्जतच्या वैभवात भर घातलेली दिसते. या वैभवातीलच एक महत्त्वाचा घटक म्हणजे कर्जत तहसील कार्यालयासमोरील शहीद स्तंभ ( रोल ऑफ ऑनर) हा होय. या शहीद स्तंभाची माहिती पार्श्वभूमी अशी आहे.
युरोपियन देशामध्ये औद्योगिक क्रांती स्थिरावल्याने यंत्र उत्पादित तयार माल विकण्यासाठी युरोपियन देशांना नवीन बाजार पेठांची आवश्यकता भासू लागली. तसेच यंत्रांची भूक भागविणाच्या कच्च्या मालाच्या गरजेतून युरोपियन राष्ट्रांमध्ये वसाहतवादी स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेच्या माध्यमातून आफ्रिका आणि आशिया खंडाच्या राष्ट्रांना आपल्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले गेले भारत पारतंत्र्यात असताना ब्रिटिशांच्या सैन्यात भारतीय लोकांचा भरणा मोठ्या प्रमाणात होता. आपल्या साम्राज्यवादाची वाढ व सुरक्षितेच्या दृष्टीने भारतीय सैनिकांचा उपयोग केला गेला. अर्थात आर्थिक साम्राज्य वादातून युरोपियन राष्ट्र दोन गटात विभागली गेली. या गटांमध्ये पहिले जागतिक महायुद्ध झाले. एका बाजूने फ्रान्स, रशिया, इंग्लड ही राष्ट्र, तर दुसऱ्या बाजूला जर्मनी, ऑस्ट्रेलिया, हंगेरी यांच्याशी लष्करी कराराने बांधले गेले होते. भारत हा ब्रिटिशांच्या वर्चस्वाखाली होता. पहिल्या जागतिक महायुद्धात इंग्लंडने दोस्त राष्ट्रांच्या गटात सामील होऊन उडी घेतली होती.
भारत हा पारतंत्र्यात असतानाच २८ जुलै १९१४ ते ११ नोव्हेंबर १९१८ या काळात पहिले जागतिक महायुद्ध युरोपियन देशात लढले गेले. शास्त्रीय ज्ञानाच्या प्रगतीमुळे यात अनेक विध्वंसक आणि प्राणघातक शास्त्राचा उपयोग केला गेला. त्यामुळे मानवी जिवीत व वित्ताची भयंकर हानी झाली. त्यामुळे नागरी जीवनावर विपरित परिणाम घडून आला. युरोपियन देशात लढल्या गेलेल्या या युद्धात भारतीय सैनिकांचा ब्रिटिशांच्या बाजूने सहभाग नोंदविला होता. अनेक तरुण मुलांना प्रशिक्षणाशिवाय युद्ध भूमीवर पाठविले जायचे.
भारतीय करदात्यांच्या जिवावर १९१८ पर्यंत ७५ हजार सैनिक महायुद्धात लढायला गेले. भारतातील विविध भागातील सैनिक पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांच्या बाजूने लढले व शहीद झाले. त्या विरगती प्राप्त सैनिकाच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांची आठवण म्हणून देशातील ज्या भागातील सैनिक युद्धात शहीद झाले. त्याठिकाणी अर्थात मामलेदार कचेरी (तहसील) ठिकाणच्या गावी हे शहीद स्तंभ उभारण्यात आले आहेत. या स्तंभालाच ‘रोल ऑफ ऑनर’ असेही म्हणतात. महाराष्ट्रामधील ऐतिहासिक अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतमध्ये अशाच प्रकारचा शहीद स्तंभ उभारण्यात आला आहे.
• या जागतिक महायुद्धात वीर मरण पत्करणाऱ्या सैनिकांमध्ये कर्जत तालुक्यातील काही वीर सैनिकांचा उल्लेख सापडतो. आणि या शहीदांच्या स्मरणार्थ कर्जतमध्ये शहीद स्तंभ (रोल ऑफ ऑनर) जमारला गेला आहे. पहिल्या महायुद्धात लढलेल्यांपैकी ४०,६४१ मृतांची ओळख पटली होती. त्या सर्वांना इराक आता नासिरियांच्या रस्त्यालगत ३२ कि.मी. अंतरादरम्यान पहिल्या महायुद्धाची रणभूमी होती. या महायुद्धात शहीद झाल्यांवर बारसा मेमोरियल (इराक) या स्मशान भूमीत अत्यसंस्कार करण्यात आले. आणि दोन खंडाना जोडणारा ‘रोल ऑफ ऑनर तयार केला व तो मेडनहेड येथील आयोगाच्या मुख्य कार्यालयात प्रदर्शित केला. त्या रोल ऑफ ऑनरच्या डिजिटल आवृत्या तयार केलेल्या आहेत. व त्या लोकांसाठी उपलब्ध आहे.
रोल ऑफ ऑनर बाबत तात्कालीन काळात इराक ने कले आहे की, राजकीय अस्थिरतेचे सध्याचे वातावरण कायम ताना इराकमधील स्मशान आणि स्मारक व्यवस्थापित करणे किंवा त्यांची देखभाल करणे हे आमच्यासाठी अत्यंत आव्हानात्मक आहे. तात्पुरता
उपाय म्हणून मृतांची नावे पाहिली जाऊ शकतात. याची खात्री करण्यासाठी आम्ही इराकमध्ये दफन करण्यात आलेले आणि स्मरणार्थ झालेल्या सर्व मृतांची यादी असलेल्या दोन खंडाचा सन्मान रोल तयार केला आहे. आम्ही इराकमधील परिस्थितीचे निरीक्षण करणे सुरू ठेवतो. आणि एकदा राजकीय वातावरण स्वीकारार्ह पातळीवर सुधारले की, आम्ही स्मशानभूमी आणि स्मारकासाठी एक मोठा पुनर्वसन प्रकल्प सुरू केला. आणि त्याचाच एक भाग म्हणजे कर्जत मधील ‘ रोल ऑफ ऑनर’ ची प्रतिकृती होय.
या रोल ऑफ ऑनर बाबतची अतिरिक्त माहिती वेबवर डिकसळ येथील (कर्जत तालुका) लक्ष्मण पुराणे यांनी दिली आहे. कर्जत हे शहर शूरवीरांचे शौर्याचे प्रतिक असल्यामुळे आणि पहिल्या महायुद्धात कर्जतमधील सैनिकांनी शौर्य आणि साहसाची महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ‘रोल ऑफ ऑनर’ च्या प्रतिकृती बाबतचे रेकॉर्ड शिपाई सिदु (११० वी महाराष्ट्र लाईट इन्फंट्री) यांनी संकलित केली असून ते मंगळवार दिनांक ११ एप्रिल १९१६ रोजी पहिल्या महायुद्धात शहीद झाले होते.
शिपाई केसू भईरु कसरे जलालपूर कर्जत (१०५ वी महाराष्ट्र लाईट इन्फंट्री) यांचे कार्य महत्त्वाचे आहे. ते ९ जानेवारी १९१७ रोजी पहिल्या महायुद्धात शहीद झाले. तसेच शिपाई बाबुराव भिवा वरकड कडा कर्जत (११७ वी महाराष्ट्र इन्फंट्री) हे ही शहीद झाले होते. शिपाई विठोबा सखाराम डोबळे रा. कडा, कर्जत (१०५ वी महाराष्ट्र लाईट इन्फंट्री) हे दिनांक ९ जानेवारी १९१७ शहीद झाले. प्रथम जागतिक महायुद्धात वीरगती प्राप्त झालेल्या कर्जत तालुक्यातील शहीदांच्या स्मरणार्थ उभारलेला शहीद स्तंभाची (रोल ऑफ ऑनर) वर्षातून तीन वेळा अर्थात २६ जानेवारी, १५ ऑगस्ट व १ मे या दिवशी स्वच्छता, सजावट करण्याचे काम न विसरता भीमशंकर सोमनाथ पखाले हे करतात हे उल्लेखनीय आहे.
जवळ जवळ १०० वर्षे पूर्ण झालेल्या या कर्जत शहर व तालुक्याच्या वैभवात भर टाकणारा ऐतिहासिक वारसा ठरलेल्या या शहीद स्तंभाची शासन स्तरावर दखल घेऊन या ऐतिहासिक वारस्याचे जतन व संवर्धन शासन पातळीवर होणे गरजेचे आहे. ज्या महान वीरांच्या स्मरणार्थ हा शहीद स्तंभ उभारलेला आहे. त्या वीरांपासून आजच्या तरुणांनी प्रेरणा घेतली पाहिजे. त्यांच्या कार्याचे उचित स्मरण करून देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा या संदर्भातील इतिहास कसा प्रेरणादायी होता त्या स्मृती जागविल्या पाहिजेत. यादृष्टीने या शहीद स्तंभाचे महत्त्व कर्जतकरांच्या जीवनात महत्त्वाचे आहे.
कर्जतचे प्रेरणास्थान ठरलेल्या अर्थात पहिल्या विश्व महायुद्धात शहीद झालेल्या कर्जत तालुक्यातील या शूरवीरांच्या शहीद स्तंभास कर्जतीयन्सचा प्रणाम! जय हिंद !! जय भारत !!!
कु. नेहा ससाणे एस.वाय.बी.ए..