दादा पाटील महाविद्यालयाच्या नीट व सीईटी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

कर्जत (प्रतिनिधी) :- रयत शिक्षण संस्थेच्या, दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथील शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये नीट व सीईटी परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयात नुकताच संपन्न झाला.
दादा पाटील महाविद्यालयातील बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेले कु. गिरी हर्षदा दीपक (५५७ गुण) कु. माधुरी अशोक शेळके (५२५ गुण) या विद्यार्थिनींनी नीट परीक्षेमध्ये यश मिळवल्याबद्दल त्यांचा महाविद्यालयामार्फत सन्मान करण्यात आला. तसेच सीईटी परीक्षेत हजारे स्वप्नील सुनील या विद्यार्थ्याने पीसीएम ग्रुपमध्ये (९९.२७%) गुण मिळवून कर्जत तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला. तसेच क्षीरसागर हनुमंत विठ्ठल (९६.४९%), शेख अरमान रफिक (९६.१०%), घोगरे केतकी गणपत (९५.५८), जगदाळे पायल रमेश (९५.२१%), गायकवाड अश्विनी अनिल (९५.०८%), गरड दादासाहेब कल्याण (९४.४४), मेढे तनुजा भारत (९४%) या विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेमध्ये यश मिळवल्याबद्दल महाविद्यालयातर्फे सर्वांचा त्यांच्या पालकांसहित सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभाकरिता रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व दादा पाटील महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा. राजेंद्र तात्या फाळके, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य प्रा. एम आर खंडागळे, कला विभाग प्रमुख प्रा. प्रताप काळे, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. ए. बी. सय्यद, विज्ञान विभाग प्रमुख प्रा. एस. एस. देशमुख, सीईटी व नीट परीक्षेचे प्रकल्प प्रमुख प्रा. प्रवीण घालमे तसेच महाविद्यालयातील सर्व सेवक वर्ग व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.
महाविद्यालयाचा नीट, सीईटी प्रकल्प, क्रॅश कोर्स, सराव परीक्षा व विविध बौद्धिक सत्रांच्या माध्यमातून जे उपक्रम महाविद्यालयामध्ये राबविले जातात, त्याचा फायदा नीट व सीईटी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मिळाल्याचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी नमूद केले.