कोरेगाव फाटा-कोरेगाव रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न – प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन
कोरेगाव फाटा, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर – कर्जत तालुक्यातील कोरेगाव फाटा येथे रामा ६७ (कोरेगाव फाटा) ते कोरेगाव रस्ता (साकळी क्र. ०/०० किमी ते २/७०० किमी) या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
ही योजना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झाली असून, रस्त्याच्या कामासाठी अंदाजित ₹२ कोटी ९४ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. स्थानिक कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या मागणीनंतर हा रस्ता मंजूर करण्यात आला आहे.
या रस्त्यामुळे कोरेगाव गावाचा दळणवळण सुलभ होऊन परिसरातील विकासाला चालना मिळणार आहे. हा रस्ता ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या भूमिपूजन सोहळ्याला भाजपचे ज्येष्ठ नेते कैलास अण्णा शेवाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक खेडकर व प्रवीण घुले, मंडल अध्यक्ष अनिल गदादे, दादासाहेब सोनमाळी, सरपंच बापुराव शेळके, उपसरपंच कांतीलाल वाघ, नाना शेळके, अजित शेळके, बबन हजारे, निळकंठ मुरकुटे, अरुण शेळके, ॲड. भीमराव शेळके, अक्षय शेळके, विजय भीमराव पाचपुते, हरिभाऊ मुरकुटे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात स्थानिक जनतेने समाधान व्यक्त करत मान्यवरांचे आभार मानले आणि रस्त्याच्या गुणवत्तेची काळजी घेण्याची अपेक्षा व्यक्त केली.