Advertisement
आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते कापरेवाडी रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन

Samrudhakarjat
4 1 1 9 7 7

(कर्जत प्रतिनिधी) :- कापरेवाडी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर – येथील प्रजिमा ११५ ते कापरेवाडी रस्ता (साकळी क्र. ०/०० किमी ते २/७०० किमी) या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले. त्यांच्या उपस्थितीत आणि मोठ्या संख्येने जमलेल्या ग्रामस्थांच्या साक्षीने हा सोहळा उत्साही वातावरणात झाला.

हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झाला असून, त्यासाठी अंदाजे ₹ १ कोटी २३ लाख इतका खर्च अपेक्षित आहे. या रस्त्यामुळे कापरेवाडी – शिंदेवाडी परिसरातील दळणवळण अधिक सुलभ होणार असून, स्थानिक शेतकरी, विद्यार्थी, रुग्ण आणि कामगार वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. कृषी, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या क्षेत्रातही या रस्त्यामुळे सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला.

या भूमिपूजन कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ नेते श्री. कैलास अण्णा शेवाळे, सभापती श्री. काकासाहेब तापकीर, नगराध्यक्षा रोहिणी घुले, माजी जि.प. सदस्य अशोक खेडकर, माजी जि.प. सदस्य प्रवीण घुले, मंडळ अध्यक्ष अनिल गदादे, दादासाहेब सोनमाळी, ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल खराडे, माजी सरपंच बबन खळगे, उपसरपंच नवनाथ मोडके यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामस्थांच्या दीर्घकालीन मागणीला प्रतिसाद देत रस्त्याचे काम मंजूर झाल्यामुळे ग्रामस्थांत समाधानाची भावना असून, या विकास कामामुळे परिसरातील इतर प्रलंबित योजनांनाही गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत  आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker