राशिनमधील १५०० बांधकाम कामगारांना अंबादास जाधव यांच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ; युवक नेते राजेंद्र देशमुख यांनी मानले आभार.

राशिन प्रतिनिधी जावेद काझी .(वार्ताहर):कर्जत तालुक्यातील राशिन परिसरातील सुमारे १५०० गोरगरीब बांधकाम कामगारांना शिवसेना (शिंदे गट) बांधकाम कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास जाधव यांनी विविध शासकीय योजनांचा थेट लाभ मिळवून दिला आहे, असे गौरवद्गार युवक नेते राजेंद्र देशमुख यांनी काढले.राशिन येथे बांधकाम कामगारांना जीवनावश्यक गृहपयोगी वस्तू, ट्रेनिंग प्रमाणपत्र आणि मानधन वाटप करण्याचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून राजेंद्र देशमुख बोलत होते.कामगारांसाठी कोट्यवधींचा निधी आणि विमा मंजूरआपल्या भाषणात पुढे बोलताना राजेंद्र देशमुख म्हणाले की, अंबादास जाधव (तात्या) यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राशिन परिसरातील कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तसेच कामगारांच्या पाल्यांना (विद्यार्थ्यांना) सुमारे दोन कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मिळवून देण्यात आली आहे. दुर्दैवाने निधन झालेल्या तीन बांधकाम कामगारांच्या कुटुंबांना प्रत्येकी ३ लाख याप्रमाणे एकूण नऊ लाख रुपयांचा विमा क्लेम मिळवून देण्याचे अत्यंत मोलाचे काम जाधव यांनी केले आहे.राशिन येथे स्वतंत्र रुग्णालय उभारण्याचे आश्वासनया कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले बांधकाम कामगार शिवसेना (शिंदे गट) महाराष्ट्र कार्याध्यक्ष संतोष राजपूत यांनी कामगारांना संबोधित केले. जर स्थानिक ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून दिली, तर राशिन परिसरातील बांधकाम कामगारांच्या आरोग्य सुविधेसाठी एक स्वतंत्र रुग्णालय उभारण्यात येईल, असे मोठे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

मान्यवरांची मोठी उपस्थितीया भव्य कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. यामध्ये प्रामुख्याने:प्रीतमजी दारिया (प्रदेशाध्यक्ष, बांधकाम कामगार सेना, शिंदे गट)नितीन तोरडमल (शिवसेना तालुकाध्यक्ष)विकास मोढळे (माजी कृषी अधिकारी)गुरुनाथ सुतार (पुणे उपजिल्हाप्रमुख, शिवसेना कामगार)रिजवान शेख (शिवसेना प्रमुख, हडपसर)युवक नेते भीमराव साळवे, संतोष काशीद, राहुल राऊत, महेश उकिरडेग्रामपंचायत सदस्य नाझीम काझी, अतुल साळवे, अमोल जाधव, सागर मासाळया कार्यक्रमासाठी राशिन परिसरातील बांधकाम कामगार आणि महिला भगिनी अत्यंत मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन दीपक थोरात यांनी केले, तर उपस्थितांचे आभार स्वतः जिल्हाप्रमुख अंबादास जाधव यांनी मानले.



