कर्जतच्या व्यापारी नकाशावर नवी भर; वेदांत ग्राफिक्स व प्रथमेश गिफ्टस् दालनाचे उद्घाटन


कर्जत : कर्जत शहराच्या व्यापारी नकाशावर आणखी एक महत्त्वाचा टप्पा जोडला गेला असून वेदांत ग्राफिक्स अँड प्रिंटर्स व प्रथमेश गिफ्टस् अँड नॉव्हेल्टिज् या दोन विश्वासार्ह व्यावसायिक संस्थांच्या नव्या व प्रशस्त दालनाचा संयुक्त भव्य शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. शहरातील व्यापारी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात झाला.
या दालनाचे उद्घाटन ह.भ.प. अशोक महाराज बोंगाणे यांच्या पावन हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रोहिणीताई घुले पाटील, नगरसेवक, सर्व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, व्यापारी वर्ग तसेच मित्रपरिवार व आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वेदांत ग्राफिक्स अँड प्रिंटर्स या संस्थेने गेल्या दोन दशकांत कर्जत तालुक्यात छपाई क्षेत्रात भक्कम स्थान निर्माण केले आहे. बॅनर, फ्लेक्स, व्हिजिटिंग कार्ड, लग्नपत्रिका, जाहिरात साहित्य आदी विविध प्रकारच्या छपाई सेवांमुळे या संस्थेने विश्वासार्ह ग्राहकवर्ग तयार केला आहे. पुणे येथे या संस्थेची शाखा असून अहिल्यानगर, सोलापूर, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्येही त्यांचा ग्राहकवर्ग विस्तारला आहे.
दरम्यान, प्रथमेश गिफ्टस् अँड नॉव्हेल्टिज् या फर्मने आकर्षक गिफ्ट आयटम्स, कॉर्पोरेट गिफ्ट्स, ट्रॉफीज, सन्मानचिन्हे तसेच नावीन्यपूर्ण नॉव्हेल्टी वस्तूंमुळे अल्पावधीत ग्राहकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली आहे. ग्राहकांचा विश्वास, दर्जेदार कामाची परंपरा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि वेळेवर सेवा ही या दोन्ही व्यवसायांची खास वैशिष्ट्ये मानली जातात.

नवीन व अधिक प्रशस्त जागेमुळे ग्राहकांना आता सुसज्ज आणि आधुनिक वातावरणात सेवा उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे छपाई व गिफ्ट्स या दोन्ही सेवा एकाच छताखाली मिळणार असल्याने कर्जत शहरासह परिसरातील ग्राहकांसाठी ही मोठी सोय ठरणार आहे.
या कार्यक्रमाचे निमंत्रक समस्त गांगर्डे परिवार होते. उपस्थित मान्यवरांनी नव्या दालनास शुभेच्छा देत कर्जतच्या व्यापारी प्रगतीत या उपक्रमामुळे नवी भर पडेल, असा विश्वास व्यक्त केला.
नवीन दालनाचे ठिकाण युनियन बँक ऑफ इंडिया समोर, बाजारतळ, कर्जत, जि. अहिल्यानगर येथे असून प्रोप्रायटर प्रदीप गांगर्डे (संपर्क : ९५२७१७४४५५) यांनी उपस्थितांचे आभार मानले.




