pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

रावसाहेब देशमुख मेमोरियल ट्रस्टच्या शाळेत रमजान ईद निमित्त ‘शिरखुर्मा’ वाटप.

Samrudhakarjat
4 6 5 0 2 8

(राशीन प्रतिनिधी, जावेद काझी) : – राशिन ता. कर्जत येथील रावसाहेब देशमुख मेमोरियल ट्रस्ट संचलित शाळेमध्ये आज रमजान ईदचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत एक विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. माननीय श्री. फिरोज काझी आणि त्यांच्या सहकुटुंबियांनी शाळेतील नर्सरी ते चौथीपर्यंतच्या सुमारे २०० चिमुकल्यांना शिरखुर्मा वाटप करून ईदचा आनंद द्विगुणित केला.

या कार्यक्रमाचे आयोजन स्वतः फिरोज काझी आणि त्यांच्या परिवाराने केले होते. सणासुदीच्या काळात आनंद वाटून घेण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिरखुर्म्याचा आस्वाद घेताना चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद ओसंडून वाहत होता.

या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य माननीय स्वप्नील मोढळे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. जंजिरे सर तसेच शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांनी काझी परिवाराच्या या उपक्रमाचे कौतुक करत त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचा समारोप करताना सहशिक्षिका मणियार मॅडम यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. विशेषतः काझी परिवाराने दाखवलेल्या औदार्याबद्दल त्यांनी शाळेच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker