राशिन मध्ये गॅस पाठोपाठ डिझेल पेट्रोलची टंचाई नागरिकांचे जनजीवन विस्कळीत.


राशीन प्रतिनिधी जावेद काझी :- युद्धामुळे झालेले दुष्परिणाम ग्रामीण भागापर्यंत पोहोचत असून राशीन मध्ये सध्या इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून त्याचे थेट परिणाम सर्वसामान्यांवर होत आहेत:
गॅसची प्रतीक्षा: गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलिंडर वेळेवर मिळत नसल्याने गृहिणींचे हाल होत आहेत. अनेक कुटुंबांना पुन्हा चुलीकडे वळावे लागले आहे.
पेट्रोल-डिझेलचा खडखडाट: स्थानिक पेट्रोल पंपांवर इंधन संपल्याचे बोर्ड पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतीची कामे, दुग्ध व्यवसाय आणि नोकरदार वर्गाची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

प्रशासनाकडून दुर्लक्ष: या टंचाईमुळे काळाबाजार होण्याची शक्यता वर्तवली जात असून, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून वारंवार होत आहे परंतु तहसीलदार साहेब यांनी या समस्या संदर्भात गांभीर्यपूर्वक लक्ष देत प्रशासनाकडे पाठपुरावा करावा व नागरिकांच्या होणाऱ्या अडचणींना दूर करण्याचा प्रयत्न करावा.



