भाजपा महिला मोर्चा राशीन शहराध्यक्षपदी सपना रेणुकर यांची निवड..


राशीन प्रतिनिधी : विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी कर्जत तालुका यांच्या वतीने नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. मंडलाध्यक्ष सुनील काळे यांनी ही कार्यकारिणीची निवड केली आहे . कर्जत तालुक्यातील राशीन
येथील सपना विशाल रेणुकर यांची राशीन शहर महिला मोर्चाच्या शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे . त्यांच्या निवडीचे राशिन पंचक्रोशीमध्ये स्वागत होत असून महिलामध्ये मोठा उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सपना विशाल रेणुकर या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, धार्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील महिलांच्या समस्यांना वाचा फोडणे , महिलांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न

करणे, तसेच महिलांना सामाजिक आणि राजकीय प्रवाहात सक्रीय सहभागासाठी .प्रोत्साहित करणे या त्यांच्या कार्याची दखल पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे . त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाची विचारसरणी
आणि महिलांच्या समस्यांवर प्रभावी संवाद साधण्यातही त्या आघाडीवर आहेत. सपना रेणूकर यांच्या या निवडीमुळे
कर्जत तालुक्यातील राशीन महिला मोर्चाच्या संघटनात्मक कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास सपना रेणूकर यांनी व्यक्त केला आहे.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या धोरणांची प्रभावी मांडणी सोशल मीडियावर होईल, तसेच महिलांना राजकारणात सक्रीय सहभागासाठी प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे . त्यांच्या नियुक्ती नंतर, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष प्रतिभा रेणुकर , राशिन मंडल अध्यक्ष सुनील काळे , विविध सामाजिक संस्था, कर्जत तालुक्याचे भाजप सरचिटणीस पांडुरंग भंडारी , भाजपाचे ज्येष्ठ नेते दत्ता गोसावी , शहराध्यक्ष शिवाजी काळे , महिलांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल अनेकांनी शुभेच्छा देत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



