pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

आव्हानातून चांगले घडू शकते…संपत सूर्यवंशी (संचालक, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन)

दादा पाटील महाविद्यालयात दिवाळी फराळ व माजी विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न

Samrudhakarjat
4 6 5 2 2 5

“आनंदी राहायचे असेल तर विद्यार्थ्यांमध्ये रमले पाहिजे. तरुण पिढीसमोर आज अनेक आव्हाने आहेत. मात्र आव्हानातूनही चांगले घडू शकते. रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयातील संस्कारामुळे आज प्रशासनात काम करण्याची संधी लाभली आहे. पूर परिस्थितीतून आज महाराष्ट्र सावरतो आहे. अशा संकटातूनही शेतकरी आव्हान स्वीकारतो आहे. उभा राहत आहे.” असे मत महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव संपतराव सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्राची धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्जत शहरातील रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालयामध्ये शुक्रवार दि. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत ‘दिवाळी फराळ व माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे’ आयोजन महाविद्यालयाच्या शारदाबाई पवार सभागृहात करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संपत सूर्यवंशी बोलत होते.

या मेळाव्याला माजी विद्यार्थी व सहाय्यक पोलीस आयुक्त संजय निंबाळकर, माजी पोलीस निरीक्षक लालासाहेब शेटे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे, प्राचार्य डॉ. रंगनाथ सुपेकर, विजयनाना मोढळे, पूजा सूर्यवंशी, दिपक शिंदे, नितीन धांडे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे, खजिनदार प्रा. प्रकाश धांडे, बाळासाहेब साळुंके, विशाल म्हेत्रे, प्रा. अनंत सोनवणे, विजय तोरडमल, सागर लाळगे, ऋषिकेश धांडे, भाऊसाहेब रानमाळ, सचिन सूर्यवंशी, रुपचंद जगताप आदि बहुसंख्य माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी व माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.

सर्व माजी विद्यार्थ्यांचे ‘दिवाळी फराळ व स्नेह मेळाव्याच्या’ निमित्ताने महाविद्यालयामार्फत व माजी विद्यार्थी संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले. या स्नेहमेळाव्याकरिता जवळपास साडेचारशे माजी विद्यार्थी उपस्थित होते.

याप्रसंगी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व माजी सहाय्यक पोलीस आयुक्त संजय निंबाळकर, लालासाहेब शेटे, बाळासाहेब साळुंके, सचिन सुद्रिक, प्रा. विक्रम कांबळे, संजय भैलूमे, शोभा महामुनी, स्वाती पाटील, चंद्रकांत निंबाळकर, सखाराम ससाणे, अभिजित कदम, अजित काळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. माजी विद्यार्थी नितीन धांडे यांच्याकडून माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन व दिवाळी फराळनिमित्त उपस्थित राहिलेल्या सर्वांना चहा व अल्पोपहार देण्यात आला.

दिवाळी फराळ व स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे व माजी विद्यार्थी संघाचे सर्व कार्यकारिणी सदस्य, समन्वयक प्रा. भागवत यादव, सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक व आजी व माजी विद्यार्थी संघ यांनी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. भागवत यादव यांनी तर आभार माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राम काळे, प्रा. स्वप्निल म्हस्के यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker