google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

माने – ढोकरीकर प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय!

राजेंद्र माने यांना जामीन मंजूर; प्रवीण ढोकरीकर यांचा जामीन अर्ज फेटाळला

Samrudhakarjat
5 2 4 0 7 2

कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत येथे २ ऑक्टोबर २०२६ रोजी माने व ढोकरीकर कुटुंबीयांमध्ये झालेल्या वादातून दाखल झालेल्या परस्परविरोधी गुन्ह्यांमध्ये श्रीगोंदा जिल्हा व सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या प्रकरणातील अटक आरोपी राजेंद्र काशिनाथ माने यांचा जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला असून, दुसरे अटक आरोपी प्रवीण जीवन ढोकरीकर यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. बुधवार, दिनांक १४ ऑक्टोबर रोजी न्यायालयाने हे आदेश दिल्याने या प्रकरणाकडे कर्जत तालुक्याचे लक्ष लागले आहे.

कर्जत पोलीस ठाण्यात या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल क्रमांक ५३७/२०२६ आणि ५३९/२०२६ अन्वये दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आलेल्या राजेंद्र काशिनाथ माने यांच्या वतीने ॲड. आकाश हाळनवर यांनी, तर प्रवीण जीवन ढोकरीकर यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी श्रीगोंदा जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.

दोन्ही जामीन अर्जांवर १३ ऑक्टोबर रोजी न्यायालयात जोरदार युक्तिवाद झाला. राजेंद्र काशिनाथ माने यांच्या वतीने ॲड. आकाश हाळनवर यांनी बाजू मांडताना, माने यांचा संबंधित घटनेशी संबंध नसल्याचा युक्तिवाद केला. तसेच, या प्रकरणाला राजकीय वळण देऊन राजेंद्र माने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचा मुद्दाही त्यांनी न्यायालयासमोर मांडला.

या युक्तिवादानंतर १४ ऑक्टोबर रोजी श्रीगोंदा जिल्हा व सत्र न्यायालयाने राजेंद्र काशिनाथ माने यांचा जामीन अर्ज मंजूर केला. त्यामुळे त्यांची जामिनावर तुरुंगातून मुक्तता होण्याचा मार्ग मोकळा झाला. माने कुटुंबीयांच्या वतीने ॲड. आकाश हाळनवर यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले, तर ॲड. सुमित पाटील यांनी त्यांना सहकार्य केले.

दरम्यान, याच प्रकरणातील परस्परविरोधी गुन्ह्यात अटक असलेले प्रवीण जीवन ढोकरीकर यांच्या जामिनासाठी त्यांच्या वतीने न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जाला विरोध करत मूळ फिर्यादी अमित राजेंद्र माने यांच्या वतीने ॲड. आकाश हाळनवर व ॲड. सुमित पाटील यांनी जोरदार युक्तिवाद केला.

युक्तिवादादरम्यान मूळ फिर्यादीला झालेल्या जखमांचे स्वरूप व त्यासंबंधीचे तपशील न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच, आरोपीला राजकीय पाठबळ असल्याचा मुद्दाही मांडण्यात आला. आरोपीच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या जामीन अर्जातील मुद्द्यांना प्रत्युत्तर देत मूळ फिर्यादीच्या बाजूने वकिलांनी आपली भूमिका मांडली.

दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर श्रीगोंदा जिल्हा व सत्र न्यायालयाने १४ ऑक्टोबर रोजी प्रवीण जीवन ढोकरीकर यांचा जामीन अर्ज फेटाळला.

एकाच घटनेतून दाखल झालेल्या परस्परविरोधी गुन्ह्यांमध्ये एका आरोपीला जामीन मंजूर, तर दुसऱ्या आरोपीचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही बाजूंनी न्यायालयात आपापली भूमिका ठामपणे मांडली असून, न्यायालयाच्या निर्णयामुळे या प्रकरणाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker