तुळजाभवानी नवरात्रोत्सवानिमित्त खुडे वस्ती बेनवडी येथे ह.भ.प. अक्षदा सावंत यांचे हरिकीर्तन


कर्जत (प्रतिनिधी) : तुळजाभवानी नवरात्रोत्सवानिमित्त खुडे वस्ती, बेनवडी येथे पाचव्या माळेनिमित्त युवा कीर्तनकार ह.भ.प. कु. अक्षदा सावंत यांच्या हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी आठ ते दहा या वेळेत हा धार्मिक कार्यक्रम होणार असून, परिसरातील भाविकांनी कीर्तनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, देवीच्या भक्तीसह धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना महत्त्व प्राप्त झाले आहे. ह.भ.प. अक्षदा सावंत यांच्या कीर्तनातून भाविकांना आध्यात्मिक विचार, भक्तिपर संदेश आणि प्रबोधनाचा लाभ मिळणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन आशुतोष संतोष खुडे, आदेश खुडे, गणेश खुडे, उमेश खुडे, चेतन खुडे, तुषार खुडे, सोमनाथ खुडे आणि अनिल खुडे यांच्या सौजन्याने करण्यात आले आहे. परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हरिकीर्तनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



