google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
गुन्हेगारीब्रेकिंग

कर्जत तालुक्यात कोयत्याचा वार, मारहाणीचा प्रकार; माजी सरपंचासह सात जणांवर गुन्हा दाखल!

माजी सरपंच केतन पांडुळेंसह सहा ते सात जणांविरुद्ध गुन्हा; दोघांना अटक, गंभीर जखमीवर अहिल्यानगरमध्ये उपचार

Samrudhakarjat
5 2 3 4 2 2

कर्जत (प्रतिनिधी) : मुलाला चिडवल्याबाबत विचारणा केल्याच्या रागातून जातीवाचक शिवीगाळ करत एका व्यक्तीवर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना कर्जत तालुक्यातील वालवड गावच्या शिवारात, कर्जत-वालवड चौकाजवळ घडली. संदीप आजिनाथ अवचर असे जखमीचे नाव असून, या प्रकरणी वालवडचे माजी सरपंच केतन पांडुळे यांच्यासह सहा ते सात जणांविरुद्ध मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्या पारखे आणि भिवा कोंडीबा थोरात या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. याप्रकरणी राणी संदीप अवचर (वय ३३, रा. वालवड, ता. कर्जत) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे पती संदीप अवचर यांनी संबंधितांच्या मुलाला चिडवल्याच्या कारणावरून आरोपींनी त्यांच्याकडे जाब विचारला. त्यातून वाद निर्माण होऊन जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, अवि अशोक मारकड, तात्या पारखे, भिवा कोंडीबा थोरात, माजी सरपंच केतन पांडुळे आणि अन्य दोन ते तीन जणांनी संदीप अवचर यांना मारहाण केली. यावेळी त्यांना खाली पाडून अवि मारकड याने त्यांच्या कपाळावर लोखंडी कोयत्याने वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात संदीप अवचर गंभीर जखमी झाले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अहिल्यानगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

कुटुंबीयांना धमकी दिल्याचाही आरोप

मारहाणीच्या घटनेदरम्यान केतन पांडुळे याने फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. घटनेमुळे वालवड परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र, या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे.

ॲट्रॉसिटीसह विविध कलमांन्वये गुन्हा

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ च्या कलम ३(२)(व्हीए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्या पारखे आणि भिवा कोंडीबा थोरात या दोघांना अटक केली असून, इतर आरोपींबाबत पुढील तपास सुरू आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर या प्रकरणाचा तपास करीत आहेत. मिरजगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांच्या देखरेखीखाली पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker