आमदार रोहित(दादा) पवार यांचा जाहीर नागरी सत्कार संपन्न


रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आमदार रोहितदादा पवार यांची रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल रयत संकुल कर्जत तालुका व माजी विद्यार्थी संघ, दादा पाटील महाविद्यालय, कर्जत यांचे संयुक्त विद्यमाने ‘भव्य जाहीर नागरी सत्कार’ समारंभाचे आयोजन दादा पाटील महाविद्यालयाच्या शारदाबाई पवार सभागृहात करण्यात आले होते.
या सत्कार समारंभाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर संजय नगरकर यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये आमदार रोहितदादा पवार यांची रयतचे उत्तर विभाग अध्यक्ष म्हणून झालेली निवड आपल्या दृष्टीने अभिमानास्पद गोष्ट आहे. रयतेचा रथ पुढे जात असताना नव्या पिढीचे प्रतिनिधित्व रोहितदादा पवार करीत आहेत. रयत मध्ये दादांसारखी माणसे असणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

आमदार रोहितदादा पवार यांनी नागरी सत्काराला उत्तर देत असताना सांगितले की, शिक्षण क्षेत्रात काय बदल करता येतील, क्रांती घडवून आणता येईल का ?यासाठी रयत शिक्षण संस्था हे माध्यम अतिशय चांगले आहे. सर्व शैक्षणिक संकुलामध्ये सुविधा वाढवण्यावर भविष्यात भर देण्यात येणार आहे. पालकांच्या मनातील स्वप्न मुलांच्या माध्यमातून पूर्ण करता येते. व्हिजन मनात ठेवून काम करणे गरजेचे आहे.
तीन वर्षांपूर्वी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळाली. कर्जत जामखेड तालुक्यातील रयतेच्या सर्व शाळा महाविद्यालयांकरिता अद्ययावत स्वच्छतागृहे बांधून दिली. शिवाय शालेय विद्यार्थ्यांकरिता दहा हजार सायकलींचे वाटप केले. अखिल भारतीय महिला कुस्ती स्पर्धा, बालकुमार साहित्य संमेलन, सांस्कृतिक स्पर्धेच्या माध्यमातून देशपातळीवरील उपक्रम राबविण्यात आले. रयत व इतर शाळेच्या विविध उपक्रमासाठी जवळपास ६०-६५ कोटी रुपये आजपर्यंत खर्च करण्यात आले. शासकीय दवाखाने उच्च दर्जाची बनवली. शैक्षणिक क्षेत्राकडे दुर्लक्ष केले नाही. कोविड काळात सर्वात जास्त वैयक्तिक खर्च दोन्ही तालुक्यात केला. कुसडगाव येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र सुरू केले. रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागातील सर्व शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे मत व्यक्त केले.
या सत्कारासाठी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे, नामदेव राऊत, बाळासाहेब शिंदे, प्रा. किरण पाटील, किरण नाना पाटील, आबासाहेब डमरे, विजूनाना मोढळे, बाळासाहेब साळुंके, दीपक शिंदे, प्रकाश धांडे, पूजा सूर्यवंशी, रज्जाक झारेकरी, स्वाती पाटील, तात्यासाहेब ढेरे, नितीन धांडे, ऋषीकेश धांडे, राहुल नवले, रघुआबा काळदाते, माजी प्राचार्य भानुदास नेटके, वांगडे सर, बागल सर, धांडे सर, प्राचार्य राजकुमार चौरे, पठाण मॅडम, अशोक झरेकर, भाऊसाहेब बालगुडे, नितीन देशमुख, रावसाहेब धांडे, निलेश दिवटे, मुन्ना पठाण, शिवाजी तापकीर, दत्तात्रय लष्कर, भाऊसाहेब खोसे, कल्पना माने, शिवाजी देशमुख, सुरेश गोरखे, संजय देशमाने, बाळासाहेब खंडागळे, शिवाजी पाटील, सागर तनपुरे, देविदास माने, नवनाथ शिंदे, डॉ. राजाराम कानडे, सर्व सामाजिक संघटनेचे शिलेदार, रोटी क्लब तसेच रयतमधील आजी-माजी पदाधिकारी व शाखाप्रमुख आदि मान्यवर उपस्थित होते.



