pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगराजकिय

श्री जिवाजी महाले चौक परिसरातील तुंबणाऱ्या गटर लाईनला आउटलेट; नागरिक व व्यापाऱ्यांना दिलासा

रविंद्र सुपेकर यांच्या पाठपुराव्यानंतर सचिन घुले यांची तातडीची कार्यवाही

Samrudhakarjat
4 6 6 6 8 1

कर्जत : – कर्जत नगरपंचायत हद्दीतील बाजारतळ परिसरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला गटार लाईनचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून त्यामुळे स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या समस्येवर योग्य आउटलेट काढण्याचे काम सुरू झाल्याने परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बाजारतळ भागातून येणारी गटार लाईन महावीर फरसाण परिसरात येऊन थांबत होती. पुढील योग्य मार्ग नसल्यामुळे ही लाईन वारंवार तुंबत असे. परिणामी पावसाळा असो किंवा सामान्य दिवस, गटारातील पाणी रस्त्यावर येत असल्याने दुर्गंधी, अस्वच्छता आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होत होत्या. या त्रासाला परिसरातील नागरिकांसह व्यापाऱ्यांना अनेक वर्षे सामोरे जावे लागत होते.

परिसरातील नागरिकांनी हा प्रश्न अनेकदा मांडला होता. अखेर ही बाब नगरसेवक सुवर्णा रविंद्र सुपेकर यांच्या निदर्शनास आली. त्यांनी या समस्येची गंभीर दखल घेत नगराध्यक्ष पती सचिन घुले यांच्याशी चर्चा करून या कामासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

सचिन घुले यांनीही या समस्येचे गांभीर्य ओळखत नगरपंचायत प्रशासनाशी समन्वय साधत गटार लाईनसाठी योग्य आउटलेट काढण्याचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले. सध्या हे काम मार्गी लागले असून गटार लाईनचा अडथळा दूर होत आहे.

या कामामुळे महावीर फरसाण परिसरातील गटार तुंबण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. परिसरातील व्यापारी, नागरिक आणि प्रवाशांनीही या कामाचे स्वागत करत प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधींचे आभार मानले आहेत.

 नगरपंचायत प्रशासनानेही शहरातील प्रलंबित नागरी समस्यांवर टप्प्याटप्प्याने उपाययोजना करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला असून बाजारतळ परिसरातील हा प्रश्न मार्गी लागणे ही त्याचीच एक सकारात्मक सुरुवात मानली जात आहे.

बाजारतळ येथून येणारी गटार लाईन महावीर फरसाण येथे तुंबत असल्याने नागरिक व व्यापाऱ्यांना मोठा त्रास होत होता. नगरसेवक रविंद्र सुपेकर यांच्या पाठपुराव्यानंतर नगराध्यक्ष पती सचिन घुले यांनी तातडीने पुढाकार घेत योग्य आउटलेट काढण्याचे काम सुरू केले असून त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker