pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
गुन्हेगारीब्रेकिंग

सिना नदीपात्रात वाळू माफियांचा धुमाकूळ !

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांना केराची टोपली ; पुलालगत दिवसाढवळ्या जेसीबी-ट्रॅक्टरने उत्खनन, सितपूर ग्रामस्थ संतप्त

Samrudhakarjat
4 6 6 8 1 8

कर्जत (प्रतिनिधी) : – कर्जत तालुक्यातील सिना नदीपात्रात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांना अक्षरशः केराची टोपली दाखवत मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकाराबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने ठोस कारवाई न केल्याने सितपूर ग्रामस्थ आक्रमक झाले असून महसूल व पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

सितपूर गावाच्या हद्दीत सिना नदीपात्रातील पुलालगत जेसीबी व ट्रॅक्टरच्या साहाय्याने दिवसाउघडपणे वाळू उपसा सुरू असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. या बेकायदेशीर उत्खननामुळे नदीकाठाची धूप वाढण्याची भीती निर्माण झाली असून पर्यावरणीय समतोल धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे पुलाच्या अगदी जवळच वाळू उपसा सुरू असल्याने पुलाच्या सुरक्षिततेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकारामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

ग्रामस्थांच्या मते, या प्रकरणाबाबत प्रशासनाला वारंवार कळवूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने काहींना राजकीय पाठबळ आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय वळण लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

दरम्यान, अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांनी २३ फेब्रुवारी २०२६ रोजी ५०८८ ब्रास वाळू उपशासाठी कुर्डूवाडी येथील सचिन कैलास दरवसे यांना परवानगी दिली होती. मात्र त्या आदेशातील अटींचे उघडपणे उल्लंघन होत असल्याचा आरोप होत आहे.

उत्खनन क्षेत्र निश्चित करण्यासाठी फलक व खांब उभारणे, तसेच निश्चित मर्यादेबाहेर उत्खनन न करण्याच्या अटींची सर्रास पायमल्ली होत असल्याचे समोर आले आहे. याशिवाय वाळू थराची जाडी तपासूनच उत्खनन करण्याच्या नियमांकडेही दुर्लक्ष केले जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

या संपूर्ण प्रकारामुळे महसूल व पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून तात्काळ कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सितपूर ग्रामस्थांनी दिला आहे.

परवानगी एकीकडे… उत्खनन मात्र नियमबाह्य? अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांनी दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सिना नदीपात्रातून ५०८८ ब्रास वाळू उपसा करण्यासाठी कुर्डूवाडी येथील सचिन कैलास दरवसे यांना परवानगी दिली आहे. मात्र या परवानगीतील अटींचे पालन होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. नियमांनुसार उत्खनन क्षेत्र निश्चित करण्यासाठी फलक व खांब उभारणे, निश्चित मर्यादेतच वाळू उपसा करणे, तसेच वाळू थराची जाडी तपासून उत्खनन करणे बंधनकारक आहे. परंतु प्रत्यक्षात या अटींची पायमल्ली होत असल्याने प्रशासनाने तातडीने तपास करून कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker