हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला निंबाळकर वस्ती उजळली!
बंटी यादव यांच्या प्रयत्नांना यश; प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्याने सिंगल फेज वीज प्रश्न मार्गी


कर्जत : – बहिरोबावाडी येथील निंबाळकर वस्तीमध्ये अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला सिंगल फेज वीज लाईटचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येलाच वस्ती उजळण्याचा आनंद ग्रामस्थांना मिळाला आहे. या कामासाठी विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे वीज सुविधा उपलब्ध झाली असून स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या वस्तीमध्ये दीर्घकाळापासून सिंगल फेज वीज जोडणीचा प्रश्न प्रलंबित होता. त्यामुळे येथील नागरिकांना अंधारात दिवस काढावे लागत होते. या समस्येची दखल घेत भाजपा युवा नेते निलेश उर्फ बंटी यादव यांनी पाठपुरावा करत संबंधित विभागाशी संपर्क साधून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने तातडीने काम पूर्ण केले.

हनुमान जयंतीच्या पवित्र पर्वाच्या पूर्वसंध्येला वस्तीमध्ये वीजप्रकाश झळकल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी भाजपा युवा नेते निलेश उर्फ बंटी यादव, तालुका सरचिटणीस (भाजपा युवा मोर्चा) स्वप्निल तोरडमल यांच्यासह भास्करराव निंबाळकर, मनोहर निंबाळकर, लक्ष्मण निंबाळकर, धनंजय निंबाळकर, प्रवीण निंबाळकर, राहुल निंबाळकर, अक्षय निंबाळकर, रवींद्र निंबाळकर व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्तावर वस्ती उजळल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत सर्व संबंधितांचे आभार मानले.



