उपजिल्हाधिकारीपदी प्राजक्ता कैलास साळुंके यांची निवड

कर्जत (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्य आयोगाने नुकत्याच घोषित केलेल्या राज्यसेवा २०२२ परीक्षेत अळसुंदे येथील प्राजक्ता कैलास साळुंके यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली. त्या मुलीमध्ये द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. अळसुंदे गावातील शेतकरी कुटुंबातील त्या असून संचालक विद्यानिकेतन अकॅडमी, पुणे कैलास साळुंके यांच्या त्या पत्नी आहेत. अळसुंदे येथील उद्योगपती अनिल साळुंके यांच्या भावजय आहेत.
साळुंके कुटुंबियांना सहा भाऊ असून चाळीस लोकांचे कुटुंब आहे. त्यांची परिस्थिती बिकट होती. अशा परिस्थितीत साळुंके कुटुंबासाठी मुलीच्या शिक्षणाचे महत्व समजावून सांगताना व वेळेप्रसंगी घरी येऊन मार्गदर्शन करणारे तसेच साळुंके कुटुंबासाठी मार्गदर्शक असलेले जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
त्यामुळे साळुंके कुटुंबीयांनी शिक्षण व उद्योगाच्या क्षेत्रातून खूप मोठी भरारी घेतली आहे. त्यांच्या यशामुळे अळसुंदे येथील साळुंके परिवाराच्या व ग्रामस्थांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यामुळे अळसुंदे येथील ग्रामस्थांनी जल्लोष व अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
साळुंके परिवारातील माजी पंचायत समिती सदस्य भास्कर साळुंके, जिल्हा बँक संचालक बाळासाहेब साळुंके, ज्येष्ठ नेते बाळनाना साळुंके, माजी सरपंच एकनाथ साळुंके, गोरख साळुंके व राजेंद्र साळुंके यांनी साळुंके परिवाराचे नाव खूप मोठ केले म्हणून अभिनंदनाचा वर्षाव केला.