प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी प्रा. सोमनाथ गोडसे ; सचिवपदी योगेश गांगर्डे

कर्जत तालुका प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी प्रा. सोमनाथ गोडसे, उपाध्यक्षपदी अस्लम पठाण, कार्याध्यक्षपदी प्रा. किरण जगताप तर सचिवपदी योगेश गांगर्डे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्रेस क्लबचे जेष्ठ पत्रकार विनायक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली कर्जतच्या विश्रामगृहात ही बैठक संपन्न झाली. निवडीनंतर पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
बैठकीत निवडलेली कार्यकारिणी अशी : जिल्हा प्रतिनिधी विनायक चव्हाण, भाऊसाहेब तोरडमल, खजिनदार दादासाहेब शिंदे, सदस्य किशोर कांबळे, संतोष रणदिवे, मिलिंद राऊत. या बैठकीत मागील वर्षीच्या कामकाजाचा आढावा घेऊन पुढील वर्षातील उपक्रम व कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. पुढील काळात विविध सामाजिक कार्य करून, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम कर्जत तालुका प्रेस क्लबकडून करण्याचे बैठकीत ठरले.
यावेळी गोडसे म्हणाले प्रा. सोमनाथ गोडसे (अध्यक्ष):”कर्जत तालुका प्रेस क्लबच्या माध्यमातून पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासोबतच सामाजिक कार्यातही योगदान देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. सर्व सदस्यांचा विश्वास आणि सहकार्य आम्हाला नवीन उपक्रम राबवण्यासाठी प्रेरणा देईल.”
अस्लम पठाण (उपाध्यक्ष): “पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील दुर्लक्षित प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करत राहू. या जबाबदारीसाठी मला निवडून दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.”
भाऊसाहेब तोरडमल (जिल्हा प्रतिनिधी): “पत्रकारांनी एकत्रित येऊन सर्वसामान्य जनतेच्या समस्यांना न्याय मिळवून देणे गरजेचे आहे. कर्जत तालुका प्रेस क्लबच्या माध्यमातून हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन.”
बैठकीत मागील वर्षीच्या कामकाजाचा आढावा घेऊन पुढील वर्षातील उपक्रम व कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. सामाजिक कार्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा ठराव देखील संमत करण्यात आला.