शाहूनगर परिसरातील ओपनपेस मध्ये केलेले अनधिकृत बांधकाम खुले करून देण्याबाबत राशिन शिवसेनेच्या वतीने प्रांतअधिकाऱ्यांना निवेदन.

राशीन( प्रतिनिधी ):-जावेद काझी .शिवसेना तालुका प्रमुख बापूसाहेब नेटके यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना राशीन प्रमुख दीपक जंजिरे व सर्व खरेदीदार यांच्या नेतृत्वाखाली मौजे राशीन तालुका कर्जत येथील गट क्रमांक १५०१ या गटातील बिगर शेती जागेतील राखीव ठेवण्यात आलेल्या ओपनपेस (खुली जागा) मोकळी करून देणेबाबत प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे. या निवेदनात म्हटले आहे की राशीन येथील गट क्रमांक १५०१. हा भूखंड उपविभागीय अधिकारी कर्जत यांच्याकडून बिगर शेती केलेला असून त्यांचा आदेश क्रमांक कावि २ एन एस आर ३२/२००९ कर्जत दिनांक .३१/५/२०१०. रोजी केलेला असून सदर गट नंबर बिगर शेती करतेवेळी शेख मोहसीन चांद यांनी सदर बिगर शेतीमधील अटी शर्तीला अनुसरून सदर शेख मोहसीन चांद यांच्याकडून आम्ही प्लॉट खरेदीखत करून विकत घेतला असून सदर खरेदी खत मध्ये नमूद केलेल्या रकमेचा संपूर्ण भरणा आम्ही सर्वांनी केलेला आहे. परंतु यामध्ये असलेला ओपन पेस शासकीय आदेश असताना देखील शेख मोसिन चांद यांनी खुल्या जागेत बांधकाम केलेले आहे त्यामुळे सदर शेख मोहसीन चांद यांनी शासनाच्या अटी व शर्तीचा भंग केलेला आहे. तसेच राखीव ठेवण्यात आलेल्या खुली जागा गट नंबर १५०१ या गटातील बिगर शेती प्लॉट मधील रस्त्यावर देखील अतिक्रमण केले आहे. याबाबत विचारणा केली असता सदर व्यक्ती येथील रहिवाशांनी याबाबत विचारणा केली असता दमदाटी करून अरे रावाची भाषा वापरत आहे. तुम्हाला जायचे तिथे जा माझे कोणी काही करू शकत नाही अशी धमकी देत आहे. सदर इसम शेख मोसिन चांद यांनी ओपन पेस मध्ये अनधिकृत केलेले बांधकाम एक महिन्याच्या आत खुले करून द्यावे असा आदेश प्रांत अधिकारी यांनी लेखी स्वरुपात शेख यांना काढावा अन्यथा प्रांताधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा राशीन शिवसेना शहरप्रमुख दीपक जंजिरे, रोहिदास मांढरे, इंद्र मोहन प्रजापती, विकास काळे, सागर काळे, नरेश जाधव, खलीद अन्सारी, विलास काळे, अशोक पवार, हर्षल आढाव, सुशीला पवार, कराळे विनोद, किशोर कुमार कांबळे, बाळू विठ्ठल सायकर,, इनुस भोसले, दुर्गेश वाघ, निलेश काळे, गंगाराम जाधव, भोसले विजय अरुण, शिरोळे नरेंद्र रामचंद्र, सुनील कुंभार, विठ्ठल वाघमारे, अनिल कुंभार या रहिवाशांनी दिला आहे.