कर्जत तालुका प्रेस क्लबचे पत्रकार संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा मोठया उत्सवात साजरा

कर्जत प्रतिनिधी : – कर्जत तालुका प्रेस क्लबचे पत्रकार संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा कर्जत तालुक्यातील खेड येथील लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयात संपन्न झाला. माजी आमदार तथा जेष्ठ विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या अध्यक्ष- तेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. मंचावर जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई, राजकीय विश्लेषक अन्वर राजन व प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रा. किरण जगताप उपस्थित होते. प्रा. किरण जगताप यांनी प्रास्ताविकातून प्रेस क्लबच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. अन्वर राजन म्हणाले, दुसऱ्या देशाच्या राजकीय नेत्यांवर सहजपणे कठोर टिपण्णी केली जाते, मात्र आपल्याच गल्लीतील,
गावातील नेत्यांच्या धोरणांवर बोलण्या, लिहिण्याची किंमत पत्रकारांना मोजावी लागते. हेमंत देसाई यांनी भाजपा सरकारच्या विविध धोरणांवर जोरदार टीका करत पत्रकारांनी निडरपणे काम करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. प्रसाद ढोकरीकर, बापू धोंडे, विलास निकत, नितिन देशमुख यांनी मनोगते व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात डॉ. सप्तर्षी म्हणाले, सध्या पत्रकारांसमोर मोठी आव्हाने आहेत, ती पेलण्याचे दिव्य त्यांना पार पाडावे लागत आहे. सध्या राजकारणात धर्म आणला जात आहे. राजका रणात धर्म आला की धर्म व राजकारणाचेही वाटोळे होते. प्रेस क्लबचे उपाध्यक्ष दादा
शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. सचिव प्रा. सोमनाथ गोडसे यांनी आभार मानले. जिल्हा समन्वयक तथा नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल, कार्याध्यक्ष विनायक चव्हाण, खजिनदार किशोर कांबळे, सहसचिव अस्लम पठाण, सदस्य संतोष रणदिवे, मिलिंद राऊत, छायाचित्रकार सुनील शेटे, सुमित भैलुमे व आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. मान्यवरांची उपस्थिती : या कार्यक्रमासाठी अण्णासाहेब मोरे, प्राचार्य डॉ. संजय नगरकर, भाजपाचे नेते प्रवीण घुले, तालुकाध्यक्ष शेखर खरमरे, जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, पप्पूशेठ धोदाड, गणेश काळदाते, नितीन पाटील, माधुरी लोंढे, गणेश सुद्रिक, आशिष बोरा, नानासाहेब साबळे, श्रीराम गायकवाड, अशोक पावणे, गट- शिक्षणाधिकारी उज्वला गायकवाड, देवराम लगड, अॅड राहुल जाधव, प्रमोद शेळके, युवक क्रांती दलाचे राज्य संघटक अप्पा अनारसे व विविध भागातील कार्यकर्ते, पत्रकार व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.