डॉक्टर असोसिएशनच्या वतीने आमदार रोहित पवार यांचा सत्कार

कर्जत प्रतिनिधी :- कर्जत तालुक्यातील डॉ. गायकवाड यांच्या ‘क्षितिजा बालरुग्णालय व प्रसूतीगृह’ आणि ‘डॉक्टर असोसिएशन’ यांच्या वतीने आमदार रोहित पवार यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. आमदार रोहित पवार यांनी या सत्काराचा नम्र स्वीकार करून उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले, “कर्जत तालुका आरोग्यसेवेत नेहमीच अग्रेसर राहिला आहे. तालुक्यातील डॉक्टरांनी त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे तालुक्याच्या आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावला आहे. समाजाच्या सेवेसाठी दिलेल्या या योगदानाबद्दल मी सर्व डॉक्टरांचे मनापासून आभार मानतो. लोकांच्या आरोग्यासाठी मी देखील आपल्या सर्वांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहील.”
या कार्यक्रमाला कर्जत तालुका डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश तोरडमल, शहराध्यक्ष डॉ. मधुकर कोपनर, डॉ. राम तोरडमल, डॉ. औदुंबर गायकवाड, डॉ. नितीन साळवे, डॉ. दादासाहेब बरबडे, डॉ. अंकुश अनारसे, डॉ. संतोष गदादे, डॉ. निखिल नेटके, डॉ. मुळे, डॉ. चौधरी, डॉ. निंबाळकर, डॉ. शेळके, डॉ. पठाण, डॉ. श्रीकांत फाळके, डॉ. युवराज करपे, डॉ. प्रमोद जगताप, डॉ. कदम, डॉ. महेश ढवळे, डॉ. मंदार काळदाते यांसह अनेक मान्यवर आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी कर्जत तालुक्यातील आरोग्यसेवेत डॉक्टरांनी दिलेल्या भरीव योगदानाचा गौरवपूर्वक उल्लेख केला. विधानसभा निवडणुकीत आमदार रोहित पवार यांच्या विजयाबद्दल या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.