वालचंद विद्यालय व जुनिअर कॉलेज कळंब येथे गुणवत्ता संवर्धन अभियान अंतर्गत शाळा तपासणी संपन्न

कळंब (ता. इंदापूर): पंचायत समिती इंदापूरच्या वतीने गुणवत्ता संवर्धन अभियान अंतर्गत तालुकास्तरीय शाळा तपासणी शुक्रवार, दि. 27 डिसेंबर 2024 रोजी वालचंद विद्यालय व जुनिअर कॉलेज, कळंब येथे पार पडली.
तपासणी पथकात गटशिक्षणाधिकारी मा. अजिंक्य खरात, केंद्रप्रमुख मा. दराडे, विषय तज्ञ मा. सय्यद सर, तसेच मुख्याध्यापक आणि शाळेतील वरिष्ठ शिक्षकांचा समावेश होता.
तपासणीदरम्यान विद्यालयाची गुणवत्ता, भौतिक सुविधा, शालेय उपक्रम यांसारख्या विविध बाबींचा आढावा घेण्यात आला. तपासणी पथकाने विद्यालयाच्या सर्व बाबींवर समाधान व्यक्त करत, शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
तपासणी प्रक्रियेदरम्यान विद्यालयाचे प्राचार्य मा. अर्जुन सर, पर्यवेक्षक आळंद सर, जुनिअर विभाग प्रमुख सावंत सर यांच्यासह धनवडे सर, काशीद सर, शेख सर, आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.
या तपासणीमुळे विद्यालयाच्या शैक्षणिक आणि भौतिक प्रगतीबाबत तालुक्यात सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.