pub-1628281367759110
Advertisement
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
Trending

महात्मा फुले चौकात झेंड्याच्या वादावरून पोलिसांवर हल्ला…

Samrudhakarjat
4 4 3 4 8 2

कर्जत | प्रतिनिधी :- कर्जत शहराच्या मध्यवर्ती असलेल्या महात्मा फुले चौकात झेंडाविषयक वाद पुन्हा चिघळला असून, ५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री कर्जत पोलिसांवर जमावाने धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रशासनाच्या वारंवार सूचना आणि बैठकीनंतरही काही लोकांनी विनापरवाना झेंडा लावण्याचा प्रयत्न केल्याने हा वाद पेटला.

या प्रकरणी १७ जणांची नावे निष्पन्न झाली असून १७ जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणि गोंधळ घालण्याचे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वादाचा पार्श्वभूमीवर सलोखा निर्माण करण्याचे प्रयत्न अपयशी गेल्या काही दिवसांपासून कर्जत शहरातील महात्मा फुले चौकात भगवा झेंडा लावण्यावरून दोन समाजांमध्ये तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस व महसूल प्रशासनाने सलोखा निर्माण करण्यासाठी दोन्ही समाजातील मान्यवर नागरिकांच्या अनेक बैठकांचे आयोजन केले होते. झेंडा लावण्याचा प्रश्न प्रशासनाकडे सोपवून शांतता राखण्याचे आवाहन वारंवार करण्यात आले होते.

५ ऑगस्ट रोजी रात्री १२.१५ च्या सुमारास पोलीस निरीक्षक सोपान सिरसाठ यांना गोपनीय विभागाचे कर्मचारी दीपक कोल्हे यांनी कळवले की, महात्मा फुले चौकात सचिन सोनमाळी यांच्यासोबत अंदाजे १००-१२० लोक जमा झाले होते, ते जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यात खड्डा करून लोखंडी पोल बसवून झेंडा लावण्याच्या तयारीत आहेत.

याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सिरसाठ हे एपीआय मुलाणी, एपीआय वसावे, पीएसआय बोराडे आणि इतर पोलीस स्टाफसह घटनास्थळी गेले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी लोखंडेही उपस्थित होते. पोलिसांनी जमावाला विनापरवाना झेंडा लावू नये, असे समजावले असता, सचिन सोनमाळी व शरद म्हेत्रे यांच्यासह काही व्यक्तींनी पोलिसांवर धक्काबुक्की केली, शिवीगाळ केली आणि जमावाला झेंडा लावण्यास भडकावले. 

गर्दीतील लोकांनी पोलिसांवर धाव घेत त्यांना बाजूला ढकलले व झेंडा उभारला. तोपर्यंत आरसीपी पथक घटनास्थळी पोहोचताच जमावाने पळ काढला. नंतरच्या तपासात खालील व्यक्तींची नावे निष्पन्न झाली:

1. सचिन सोनमाळी 2. शरद म्हेत्रे 3. युवराज राऊत 4. शुभम झगडे 5. उत्तम सोनमाळी 6. विशाल होले 7. उद्धव शिंदे 8. कृष्णा म्हेत्रे 9. अमोल गदादे 10. किशोर म्हेत्रे 11. वैभव गदादे 12. मोहन मोहनकर 13. नाना राऊत14. बापू गदादे 15. तात्यासाहेब क्षिरसागर 16. महेश जमदाडे 17. धनंजय आगम

सर्वजण कर्जत शहरातील असून, यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 132, 121(1), 189(2)(3)(4), 191(2)(3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शासनाचे स्पष्ट आदेश असतानाही रात्रीच्या सुमारास मुख्य रस्त्यावर झेंडा लावण्याचा प्रयत्न करताना पोलिसांवर हल्ला होणे ही अतिशय गंभीर बाब आहे. यामुळे कायदा-सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होण्याची मागणी शहरातून होत आहे.

3.7/5 - (7 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker