कैलासवासी लक्ष्मणराव भानुसे यांच्या स्मृतीदिनानिमित्त सामाजिक संघटनांना स्वयंचलित यंत्राची भेट

कर्जत/प्रतिनिधी दि. ०१ गेल्या साडेचार ते पावणे पाच वर्षापासून पर्यावरण संवर्धन व वृक्षारोपण करणाऱ्या सर्व सामाजिक संघटनेला आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रत्यर्थ गवत कापणी मशीन भेट देण्याचा अनोखा उपक्रम भानुसे कुटुंबीयांनी केला आहे.
कर्जत येथील जुन्या काळातील शिक्षक कैलासवासी लक्ष्मणराव फकीरा भानुसे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त त्यांच्या कुटुंबातील विवेकानंद भानुसे,विकास भानुसे शिवांजली कोळेकर,ज्योती लवटे यांनी गेल्या साडेचार ते पावणे पाच वर्षापासून वृक्षारोपण पर्यावरण संवर्धन करणाऱ्या सर्व सामाजिक संघटनेला व तसेच या पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी एक
अत्याधुनिक गवत कापणी स्वयंचलित मशीन भेट देऊन एक वेगळा पायंडा घातला आहे. पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून गेल्या साडेचार ते पावणे पाच वर्षापासून आपण लोक या पर्यावरणाचे संवर्धन व वृक्षारोपण करत आहात तसेच मोठ्या गवतात आत शिरून झाडांचे संवर्धन करीत आहात. आम्हीही समाजाचे काहीतरी देणे लागतो आहोत म्हणून ही भावना मनात ठेवून आम्ही हे यंत्र भेट देत आहोत. अशी भावना भानुशे कुटुंबीयांनी व्यक्त केली.