राशीनमध्ये स्व. लोकनेते बापूसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न…

(समृध्द कर्जत प्रतिनिधी) :- २१ जुलै २०२५ कर्जत तालुक्यातील राशीन (ता. कर्जत) येथे स्व. लोकनेते के. रा. ऊर्फ बापूसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने ग्रामस्थ, कार्यकर्ते आणि हितचिंतक सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन विक्रम भय्या देशमुख होते. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “स्व. बापूसाहेब देशमुख हे खरे अर्थाने जनतेचे नेते होते. त्यांनी कधीच पद, प्रसिद्धी वा सत्तेसाठी नव्हे, तर समाजहितासाठी आयुष्य वेचले. नव्या पिढीने त्यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी, हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल.”
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांमध्ये बापूराव जगताप, जनार्दन मोढळे, संजय काळे, अंकुश काळे, गणेश बरबडे, दादासाहेब कानगुडे, वैभव काळे, सुहास काळे, काका राऊत, सचिन जाधव, नाना सपाटे, विश्वास मोढले, शिवदास शेटे, तुकाराम सागडे, सदा मासाळ, मारुती कानगुडे यांचा समावेश होता. तसेच जिल्हा बँकेच्या शाखाधिकारी राणी शिंदे यांचीही उपस्थिती लक्षणीय ठरली.
कार्यक्रमात विविध मान्यवरांनी स्व. देशमुख यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकत त्यांच्या दूरदृष्टी, समाजशीलतेची भावना, आणि शेतकऱ्यांविषयी असलेल्या आत्मीयतेचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सचिव अतुल कानगुडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यानंतर सर्व उपस्थितांनी श्री संत सद्गुरु गोदड महाराज रथयात्रेसाठी शुभेच्छा दिल्या.