ब्रेकिंग
भाजपा चे नवनिर्वाचित खासदार ॲड. उज्वल निकम यांचा सभापती प्रा. राम शिंदे मित्रपरिवाराच्या वतीने अहिल्यानगर मध्ये सत्कार.
Samrudhakarjat
4
1
5
5
6
2
राशीन (प्रतिनिधी)जावेद काझी. देशभरात प्रख्यात नावलौकिक वकील म्हणून ओळख असणारे एडवोकेट उज्वल निकम साहेब यांची भारतीय जनता पार्टी नवनिर्वाचित खासदार पदी निवड झाल्याबद्दल सभापती प्राध्यापक राम शिंदे साहेब मित्रपरिवाराच्यावतीने अहिल्यानगर येथील शासकीय विश्राम ग्रहात भाजपा नेते शहाजीराजे राजेभोसले यांच्या हस्ते निकम यांचा शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ, देऊन सत्कार करण्यात आला.
या भेटीवेळी उज्वल निकम यांनी मी पुढील महिनाभरात राशीन येथे आई जगदंबे च्या नगरीत देवीच्या दर्शनासाठी नक्कीच येईल असा शब्द नवनिर्वाचित खासदार उज्वल निकम यांनी शहाजीराजे यांना दिला. यावेळी शहाजीराजे यांनी पुढील भावी वाटचालीस निकम यांना शुभेच्छा दिल्या.