हंडाळवाडी निसर्ग पर्यटन स्थळाचा वन खात्याचा अंदाधुंदी कारभार कारभाराविरोधात हंडाळवाडी ग्रामस्त आक्रमक

(कर्जत प्रतिनिधी) :- हंडाळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर या गावांमध्ये पुणे वन्यजीव विभाग पुणे वनपरिक्षेत्र रिहेकुरी तालुका अंतर्गत हंडाळवाडी निसर्ग पर्यटन स्थळाला शासनाकडून भरीव असा निधी आला. हे काम कर्जत तालुका वनपरिक्षेत्राचे मुळे साहेब यांनी हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे करून घेतले. येथे प्राण्यांचे स्टॅचू निकृष्ट दर्जाचे करण्यात आले.
येथे गेट असेल या ठिकाणातील तारचे कंपाऊंड असेल या कंपाऊंडला तारेचे स्क्रू व पट्ट्या याही कमी प्रमाणात वापरल्या गेल्या आहे. तसेच या ठिकाणावरील लाईटचे सौर खांबचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे.सहज सौर चे खांब पडतात. सौर च्या प्लेटा सहज उडून जातात. व रस्ता होता. तो ही खराब झालेला आहे.
मुरमीकरण ही केले नाही.तसेच बांधकामावर काहि ठिकाणी पाणी मारले परंतु काही ठिकाणी पाणी मारले नाही.बोगस बिले काढले.अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झाले. या कामावर हंडाळवाडीतील ग्रामस्थ आक्रमक झालेले आहे. याची माहिती सखोल चौकशी व्हावी यासाठी आज पासून ते २७ जुलै पर्यंत न मिळाल्यास समस्त ग्रामस्थ हंडाळवाडी यांच्या वतिने वनपरिक्षेत्र रेहेकुरी अभयारण्य कर्जत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे. याची फॉरेस्ट डिपार्टमेंट यांनी दक्षता घ्यावी. यावेळी ग्रामस्थांकडून माहितीचा अधिकार नियम २००५ अर्ज दाखल करण्यात आला आहे यावेळी. तुकाराम पवार, नारायण हंडाळ, महेंद्र कोळेकर, पोपट हंडाळ, बाळू पुणेकर, पांडुरंग बंडगर, संतोष बंडगर , महादेव पारखे व राहुल पवार इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.