“स्व. बापूसाहेब ढोकरिकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भक्तांसाठी ढोकरिकर कुटुंबीयांची उजळ देणगी; गोदड महाराज मंदिरात सायलेंट जनरेटर ”

कर्जत, प्रतिनिधी – श्री संत सद्गुरु गोदड महाराज मंदिरात गेल्या काही महिन्यांपासून वारंवार होणाऱ्या वीज खंडित होण्याच्या समस्येमुळे संध्याकाळी होणारी पूजा, हरिपाठ, भजन तसेच महाप्रसाद वितरण यासारख्या धार्मिक कार्यात वारंवार अडथळे येत होते. मंदिरातील दिवे, हॅलोजन लाईट आणि संपूर्ण प्रकाशयोजना अचानक बंद पडल्यामुळे भक्तांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत होते.
ही गंभीर गरज ओळखून व श्रद्धाळू भक्तांच्या सोयीसाठी स्व. बापूसाहेब (जीवनराव) ढोकरिकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कर्जत नगरपरिषद सदस्य प्रसाद ढोकरीकर, प्रविण ढोकरीकर यांच्या वतीने मंदिराला चांगल्या होंडा कंपनीचा सायलेंट जनरेटर भेट देण्यात आला आहे. सदर जनरेटरची किंमत सुमारे १,४०,००० रुपये असून तो मंदिराच्या सेवेसाठी कायमस्वरूपी उपलब्ध राहणार आहे.
हे जनरेटर केवळ एक यंत्र नसून, मंदिरातील दीपमाळ अखंड पेटती राहावी, भक्तांची पूजा-अर्चा आणि श्रद्धा खंडित होऊ नये, हा पवित्र हेतू या मागे असल्याचे प्रसाद ढोकरीकर यांनी सांगितले.
जनरेटर हस्तांतर समारंभ प्रसंगी ढोकरीकर कुटुंबातील नगरसेवक प्रसाद ढोकरीकर, प्रविण ढोकरीकर, विक्रांत ढोकरीकर, केदार ढोकरीकर उपस्थित होते. तसेच उद्धव नाना भोगे, अॅड. उत्तम नेवसे बाप्पू, शिवाजी
आप्पा राऊत, भाजपा तालुकाध्यक्ष अनिल गदादे, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस विनोद दळवी, काकासाहेब धांडे, सुरेश काका ख्रिस्ती, अनिल दादा भैलुमे, बप्पाजी धांडे, संजय काकडे, अर्जुन भोज, शिवाजी दादा शेळके, गिरीष पाटील, नाना क्षिरसागर, किशोर कुलथे, जयवंत महामुनी, ओंकार शेटे यांच्यासह मंदिर समितीचे सर्व पुजारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यामुळे येत्या पंधरवडा दिंडी, पैठण दिंडी यांसारख्या मोठ्या धार्मिक सोहळ्यांमध्ये वीजेचा अडथळा येणार नाही आणि मंदिरातील उपासना अखंड सुरू राहील, असा विश्वास भाविकांनी व्यक्त केला.