अंबादास जाधव यांनी कामगार आयुक्त रेवनाथ बिसले यांची कर्जत तालुक्यातील रखडेल्या ज्वलंत प्रश्ना बाबत घेतली भेट.

राशीन ( प्रतिनिधी) जावेद काझी. अहिल्यानगर येथील सहाय्यक कामगार आयुक्त श्री रेवन्नाथ बिसले साहेब यांची अहिल्यानगर उपजिल्हा प्रमुख श्री अंबादास भगवान जाधव यांनी कर्जत तालुक्यासह राशीन व परिसरातील बांधकाम कामगार यांचे नोंदणी कार्ड, शिष्यवृत्ती प्रकरणे, घरकुल प्रकरणे त्वरित मार्गी लावावे यासाठी माननीय श्री प्रीतमशेठ धारिया साहेब अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य शिवसेना बांधकाम कामगार सेना यांच्या मार्गदर्शनाखाली प्रलंबित प्रश्नाबाबत सदिच्छा भेट घेतली. यावेळी शिवसेना बांधकाम कामगार सेना अहिल्यानगर दक्षिण जिल्हाप्रमुख सौ. मनीषा पंकज पारखे यांचे विशेष योगदान लाभले. यावेळी अंबादास जाधव यांनी कर्जत तालुक्यातील विविध जीवनावश्यक रखडलेल्या
प्रश्नाबाबत रेवन नाथ बिसले यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर या परिसरातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी योग्य कागदपत्रे देऊन पाठपुरावा करून कर्जत तालुक्यातील विविध रखडलेले प्रश्न मार्गी लावावे याबाबत चर्चा केली. यावेळी श्री स्वप्निल प्रकाश काळे व इतर मान्यवर उपस्थित होते.