अदवय महांडुळेचे राज्य गणित प्रज्ञा परीक्षेत उज्ज्वल यश

कर्जत : न्यू गुरुकुल इंग्लिश स्कूल कर्जत मधील इयत्ता पाचवी चा विद्यार्थी अदवय महांडुळे याने महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळ परीक्षा समिती लातूर यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या राज्य गणित प्रज्ञा परीक्षा २०२४- २५ च्या निकालात घवघवीत यश संपादन केले असून त्याचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
त्याला राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत गोल्डन कॅटेगरी मधून शिष्यवृत्ती व पदक प्राप्त झाले आहे. त्यामुळे आज शाळेच्या प्रांगणात एका कार्यक्रमात उपस्थित पालक दादा पाटील महाविद्यालयाचे विज्ञान विभाग प्रमुख श्री संदीप पै सर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी शाळेचे प्राचार्य श्री शिवाजी पाटील सर , समन्वयक श्री किरण नाईक सर ,पर्यवेक्षक श्री काळे सर , सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी व पालक उपस्थित होते यावेळी सर्वांनी त्याच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.