राशिन मध्ये शिवसेनेच्या वतीने महावितरण कार्यालयावर विविध प्रलंबित मागण्या विरोधात निवेदनाद्वारे उपोषणाचा इशारा.

राशीन (प्रतिनिधी):- जावेद काझी. राशिन महावितरण कार्यालयाकडून ग्रामस्थांना व परिसरातील शेतकऱ्यांना अनेक दिवसापासून अधिकारी व कर्मचाऱ्यां कडून वारंवार होणारा त्रास लक्षात घेता राशिन शिवसेनेच्या वतीने महावितरण विरोधात उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे दिला असून यामध्ये प्रमुख मागण्या खाली दिल्याप्रमाणे
वारंवार लाईट जाणे, पूर्वसूचना न देता लाईट बंद करणे, विज उपकेंद्रात लाईट समस्येबाबत फोन केला असता फोन न उचलणे व कदाचित उचलला तर उडवा उडवीची उत्तरे देणे,नवीन वीज कनेक्शन जोडणी साठी ग्राहकांना विनाकारण हेलपाटे मारण्यास भाग पाडणे, ५) वाढीव वीजदर आकारणे, चुकीचे लाईट बिले काढणे, रेडिंग न घेता विज बिल काढणे, ग्राहकांवर बेकायदेशीर पणे चुकीची कारवाई करणे, वेळोवेळी येणाऱ्या या ज्वलंत समस्येबाबत वारंवार मागणी करून देखील कुठलीच कार्यवाही अद्याप झालेली नाही.
तरी संबंधित वरिष्ठ कार्यालयीन अधिकाऱ्यांनी या कामी गांभीर्यपूर्वक लक्ष घालून राशिन महावितरण अधिकारी व कर्मचारी यांना शेतकऱ्यांचे व ग्रामस्थांचे तात्काळ तक्रार निवारण करण्याची आदेश द्यावेत अन्यथा राशिन महावितरण कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा शिवसेना कर्जत तालुका उपप्रमुख वृषभ परदेशी यांनी दिला आहे.
हे होणारे उपोषण शिवसेना तालुकाप्रमुख बापूसाहेब नेटके युवा शिवसेनाप्रमुख सोमनाथ शिंदे शिवसेना कामगार जिल्हा उपाध्यक्ष अंबादास जाधव यांच्या नेतृत्वाखाली होणार असून एडवोकेट सचिन रेणुकर, मातंग एकता आंदोलनाचे नेते संतोष ढावरे, हनुमंत कानगुडे, किशोर जाधव, प्रभात मीडिया वेणुनाथ चौधरी, अभिषेक रेणुकर, प्रसाद रेणुकर, एड दोभाडा, मिलिंद राऊत, दत्तात्रय जाधव व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते या होणाऱ्या उपोषणास उपस्थित राहणार आहेत.