हवलदार कोचिंग क्लासेसचा विद्यार्थी प्रथम प्रयत्नातच MBBS ला पात्र .
(कर्जत प्रतिनिधी) :- कर्जत येथील हवलदार कोचिंग क्लासेस चा विद्यार्थी प्रथमेश लक्ष्मण मुळीक याने NEET परीक्षेत 518 गुण मिळवून पहिल्याच प्रयत्नात MBBS प्रवेशासाठी पात्रता मिळवली आहे. त्याच्या या उत्तुंग यशामुळे गावात तसेच कोचिंग वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
प्रथमेश हा श्री लक्ष्मण मुळीक सर (लोणी मसदपुर) यांचा चिरंजीव असून त्याने सातत्यपूर्ण मेहनत, योग्य मार्गदर्शन आणि अभ्यासाच्या जोरावर हे यश मिळवले आहे. त्याने NEET परीक्षेची तयारी हवलदार कोचिंग क्लासेस, कर्जत येथे केली.
प्रथमेशच्या यशाबद्दल हवलदार कोचिंग क्लासेसचे संचालक श्री. हवलदार सर, श्री. तोरडमल सर आणि श्री. शेटे सर यांनी त्याचे विशेष कौतुक केले असून, त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी सांगितले की, “प्रथमेशचा आत्मविश्वास, चिकाटी आणि शिस्तबद्ध अभ्यास हीच त्याच्या यशाची गुरुकिल्ली आहे.”
हवलदार कोचिंग क्लासेसकडून दरवर्षी अनेक विद्यार्थी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रात यश मिळवत असून, प्रथमेशने त्यात आणखी एक यशाची भर घातली आहे. त्याच्या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठीही वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न आता अधिक सुलभ वाटू लागले आहे.