pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

नामदार प्रा राम शिंदे यांच्या प्रयत्नातून कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायतीना पायाभूत सुविधा अंतर्गत मिळणार केंद्राचा निधी ….

Samrudhakarjat
4 6 1 7 9 4

पुर्नरचित राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान २०२५/२६ अंतर्गत महाराष्ट्र शासनाने ३२४ कोटी २८ लाख एवढ्या रकमेच्या कृती आराखड्यास मंजुरी दिली आहे . केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या ६० / ४० या प्रमाणात संयुक्त निधीतून ही योजना राबविली जाते …

       ग्राम पंचायतीचे दैनदिन कामकाज सुलभ होण्यासाठी संसदीय समितीच्या सुचनेनुसार ग्राम पंचायतींना पायाभूत सुविधे अंतर्गत सुसज्ज , अद्यायावत कार्यालय इमारत व नागरी सुविधा केंद्र यासाठी निधी उपलब्ध होतो . राज्यातील ५०० ग्राम पंचायतींना पुर्नरचित राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान २०२५/२६ अंतर्गत निधी उपलब्ध झाला आहे …

               कर्जत मधील ग्रा प . गुरवपिप्री, भांबोरा, व सिद्धटेक या ग्रमपंचायतींना हा निधी ना प्रा राम शिंदे यांच्या प्रयत्नातून मिळाला आहे . ३००० लोकसंख्ये च्या ग्राम पंचायतीस व सद्य स्थितीत कार्यालय मोडकळीस असेल तर यासाठी या ग्रा पं . पात्र असतात …

                      गुरवपिंप्री, भांबोरा, व सिद्धटेक या ग्रामपंचायतींना आता सुसज्ज इमारत व नागरी सुविधा केंद्र ( csc) यासाठी निधी उपलब्ध झाल्याने त्या ठिकाणी कार्यालय व त्याच बरोबर नागरी सुविधा केंद्राच्या इमारती मुळे विविध सुविधा त्या ठिकाणी नागरिकांना मिळतील . नागरी सुविधा केंद्रामुळे पिकविमा भरणे, शासनाच्या विविध योजनांचे ऑनलाइन फार्म भरणे, विविध बीले भरणे, अशा सुविधांचा लाभ नागरिकांना मिळणार व ग्रा.प. चे उत्पन्न ही वाढणार आहे …

ना प्रा राम शिंदे साहेब यांच्या प्रयत्नातून हा निधी प्राप्त झाल्याचे माहिती ना . प्रा राम शिंदे यांच्या कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे …

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker