राशीन येथे मेहंत योगी वैजनाथ महाराज यांच्या मंदिर कामाचा शुभारंभ.


राशीन (प्रतिनिधी):- जावेद काझी. पूर्वकालीन प्रसिद्ध असलेले राशीन तालुका कर्जत येथील मेहंत योगी (१०८) वैजनाथ महाराज यांच्या समाधी मंदिराच्या बांधकाम कामाचा शुभारंभ आज सकाळी १० वाजता करण्यात आला. याप्रसंगी मेहंत योगी निर्भयनाथजी महाराज, योगी प्रसन्नाथजी महाराज, शाहूराजे राजेभोसले,पै. शामभाऊ कानगुडे, विजयनाना मोढळे,मा. सरपंच संदेश घोसे, ग्रामपंचायत सदस्य राम कानगुडे, अशोक जंजिरे, पै. भास्कर मोढळे,व्यवसाय उद्योजक संजय जाधव, बाप्पू धोंडे, कॉन्ट्रॅक्टर मतीन शेख,

मा. सरपंच रामकिसन साळवे, दादासाहेब परदेशी,( स्वामी)अमोल शेटे,राहुल जांभळकर, या प्रमुख उपस्थितांच्या हस्ते श्रीफळ फोडून मंदिर बांधकाम कामाचा शुभारंभ करण्यात आला. या कामासाठी लागणारे मार्बल युक्त पहाडपुर, धवलपूर कोरीव दगड राजस्थान येथून मागवण्यात आला असून हे मंदिराचे काम या विशिष्ट दगडाच्या बांधकामापासून होणार असल्याची माहिती यावेळी श्यामभाऊ कानगुडे यांनी दिली. तसेच या मंदिराच्या प्रारंगणात लागणारी पेवर ब्लॉक फरशी, माननीय आमदार रोहित दादा पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांनी दिली आहे.यावेळी विजय साळवे, गणेश थोरात, कल्याण नायकोडे, महेश आढाव, अशोक काळे, संदीप शिंदे, बाबा पानसरे, सुनील गोसावी व इतर भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.




