pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

राज्य ग्रंथालय संघावर पनाजी कदम व संभाजी पवार यांची निवड”

Samrudhakarjat
4 6 9 2 9 4

दिनांक २७/०७/२०२५ रोजी नाशिक विभाग ग्रंथालय संघाची मालेगाव येथील प.बा.काकाणी नगर वाचनालयात व्यवस्थापक मंडळाची सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.त्यात मा•पनाजी कदम(कर्जत) व संभाजी पवार (राहुरी)यांची महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ कार्यकारणी सदस्य पदी बिनविरोध निवड करण्यात आली…

तसेचअ• नगर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मा• सुरेंद्र शिंदे (पारनेर)यांना नाशिक विभागाचे उपाध्यक्ष (पदसिद्ध) अ•नगर जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह मा• आजिनाथ जायभाय (जामखेड ) यांना नाशिक विभागाचे सह कार्यवाह (पदसिद्ध )तर नाशिक विभागीय कार्यकारणी वर मा• विष्णूपंत पवार ( पाथर्डी )यांची निवड झाली…

   तर नाशिक विभागातून महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ कार्यकारणी वर सदस्य म्हणून मा• संभाजी पवार व मा•पनाजी कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली… या निवडीच्या ठरावाचे सुचक मा• सतिष पाटील सर (जळगाव ) तर अनुमोदन मा• अविनाश भदाणे सर (धुळे) तर नाशिक विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मा•दत्ता परदेशी सर, (धुळे)कार्यवाह मा•प्रविण पाटील,(नंदुरबार) कोषाध्यक्ष मा• सतिष पाटील,(जळगाव) ऐड•मा•अजय शहा साहेब,(मालेगाव)मा• आविनाश भदाणे सर(धुळे), मा• संजय पाटील (जळगाव) मा• रोहिदास हाके सर सह नाशिक विभागातील अनेक पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक पार पडली आणि भविष्यात नाशिक विभागीय ग्रंथालय संघाचे काम पारदर्शी, तसेच सर्वाना विश्वासात घेऊन नाशिक विभाग ग्रंथालय संघ चांगले पद्धतीने काम करत सर्वांचा समावेश करत घेऊन काम करणार या वर एकमत या बैठकीत झाले•••ऐड•

मा•आजय शहा व प• बा•काकणी वाचनालयाचे पदाधिकारी सह कर्मचारी यांनी बैठकीच अतिशय उत्तम नियोजन केले होते या निवडी बद्दल महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे राज्य अध्यक्ष मा•गजानन कोठेवार, (वर्धा) मा• राम मेखले (लातूर)मा•गुलाबराव मगर,(छत्रपती, संभाजी नगर) मा•अनिल बोरगमवार, (चंद्रपूर) मा• पंढरीनाथ शेळके सर (पारनेर) मा•गुलाबराव पाटील (सोलापूर) मा•नंदूभाऊ बनसोड (नागपूर ) मा•सुनील पाटील (सागंली)यांनी अभिनंदन केले तसेच महाराष्ट्र भरातून अनेकांनी शुभेच्छा देत अभिनंदन केले…

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker