रथमार्गाचे रूपांतर – नगराध्यक्ष रोहिणी घुले यांच्या कामाचे व्यापाऱ्यांकडून जल्लोषात कौतुक!


कर्जत | १९ जुलै २०२५: कर्जत शहरातील महत्त्वाच्या रथमार्गाचे सौंदर्य आणि सुविधा वाढवणाऱ्या काँक्रीटीकरण कामाबद्दल नगरपंचायतच्या प्रयत्नांचे व्यापाऱ्यांनी कौतुक केले आहे. नवी पेठ परिसरातील मेन रोड ते म्हसोबा गेटदरम्यान झालेल्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी नगराध्यक्ष सौ. रोहिणी सचिन घुले पा. यांच्या नेतृत्वात झालेल्या विकासकार्याबद्दल स्थानिक व्यापाऱ्यांनी नगरपंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.

या सत्कार कार्यक्रमात पै. प्रवीण दादा घुले पा., पाणीपुरवठा सभापती श्री. सतीश (काका) पाटील, बांधकाम समितीचे सभापती श्री. भास्कर भाऊ भैलुमे, भारतीय जनता पार्टीचे ओबीसी प्रदेश सरचिटणीस श्री. विनोद दळवी, नगरसेवक श्री. रवींद्र सुपेकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
सत्कार करणाऱ्या प्रमुख व्यापाऱ्यांमध्ये
भोगे नाना, भगवानराव कानडे, योगेश जाधव, बलू शिंदे, गिरीश पाटील, शुभम कुलथे, लखन साळुंके, प्रमोद तोरडमल, रवी शिंदे, विशाल दळवी, अमोल थोरात, गोरे आबा, प्रियांका कुलथे,गोरे तात्या यांचा समावेश होता.
व्यापाऱ्यांनी सांगितले की, “या रथमार्गावर दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते, परंतु पावसाळ्यात रस्त्याची झालेली दुरवस्था मोठी अडचण निर्माण करत होती. आता नव्या काँक्रीट रस्त्यामुळे व्यवसायालाही चालना मिळेल आणि जनतेलाही चांगली सुविधा मिळेल.”

नगराध्यक्ष सौ. रोहिणी घुले यांनी या सत्काराला उत्तर देताना सांगितले की, “रथमार्ग हा केवळ धार्मिक महत्वाचा नव्हे, तर स्थानिक व्यापाराचा कणा आहे. नागरिकांच्या गरजा आणि शहराचा विकास डोळ्यासमोर ठेवूनच कामे केली जात आहेत.”

कार्यक्रमाने परिसरात समाधान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण केले असून रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या रस्त्याच्या झालेल्या काँक्रीटीकरणाने नवी पेठ भागातील नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.




