खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी राशिन ईदगाह साठी दिलेल्या भरीव निधीमुळे रमजान ईद उत्साहात साजरी

राशीन (प्रतिनिधी )जावेद काझी. :- राशीन येथील ईदगाह मैदान मुस्लिम समाजाच्या पवित्र स्थळासाठी माननीय खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील , पालक व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून राशिन मधील ईदगाह मैदान शूशोभीकरणासाठी पेव्हर ब्लॉक बसवण्यासाठी ९.लाख ५० हजार जन सुविधा योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल गेल्या पन्नास वर्षापासून मुस्लिम समाजाचा महत्त्वकांक्षी प्रलंबित प्रश्न मार्गी लागताना दिसत असल्यामुळे यावर्षीची रमजान ईद ची नमाजपठन मागील झालेल्या ईद च्या तुलनेत हर्ष उल्हास व आनंद व्दीगुनीत खासदार सुजय विखे पाटील यांनी दिलेल्या भरीव निधीमुळे नक्कीच मुस्लिम बांधवाच्या चेहऱ्यावर रमजान ईद दिवशी दिसत होता या सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य अल्लाउद्दीन काझी व भाजपा अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष शोएब काझी यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे हा निधी उपलब्ध झाला आहे हे विसरता कामा नये.
पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम काही दिवसात पूर्ण होईल होणारे काम हे इस्टिमेटप्रमाणे व्हावे हीच मुस्लिम समाज बांधवांची इच्छा आहे. तसेच ईदगाह मैदान सुशोभीकरणासाठी जो निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल खासदार सुजय दादा विखे पाटील व आमदार राम शिंदे साहेब यांचे राशीन मुस्लिम समाजाच्या वतीने हार्दिक आभार व अभिनंदन व्यक्त केले जात आहे.