कर्जत नगरपंचायतीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वारसांना तात्काळ सेवेत सामावून घ्या – भास्कर भैलुमे नगरसेवक

कर्जत प्रतिनिधी – कर्जत ग्रामपंचायत कार्यकाळा पासुन स्वच्छता कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचारी नामे 1) लिलाबाई भाऊ कांबळे 2) कमल शिवाजी भिसे 3) विमल सुधाकर आखाडे 4) भामाबाई लश्र्मण भैलुमे व यांंच्या आधिच्या तीन महिला स्वच्छता कर्मचारी नामे 1)पार्वती ईश्वर कदम 2) सुशिला मारूती ओव्हळ 3) विमल मुरलीधर लोढे या सर्व महिला स्वच्छता कर्मचारी या
सदर ग्रामपंचायत कालीन कर्मचारी यांनी आयुष्यभर तुटूपुंजा वेतनावर सफाई कर्मचारी म्हणून काम केले आहे आणि ते ग्रामपंचायत कालखंडापासून 24 नंबर वर सफाई कर्मचारी म्हणून काम करत आहेत त्यामुळे त्यांच्या वारसांना शासन निर्णया प्रमाणे कामावर घेणे क्रम प्राप्त असताना नगरपंचायत कार्यालया कडुन स्वच्छता कर्मचारी व सर्व पदाधिकारी यांना बाबत काही कल्पना न देता सदर कर्मचारी यांना कामावरून कमी करण्याबाबत नोटीस पोस्टाद्वारे पाठवून त्या कर्मचाऱ्याबाबत नगरपंचायत कार्यालयात त्याच्या बदल असणारी द्वेशाची भावना दिसून येते. वास्तविक पाहता सदर नगरपंचायतीचे त्या महिला कर्मचारी यांचा यथोचिती सत्कार करून त्यांना सेवानिवृत्त करणे गरजेचे होते व त्यांच्या जागी त्याच्या वारसांना शासन परिपत्रक प्रमाणे मुख्याधिकारी यांच्या व सन्माननीय सभागृहाच्या मान्य तेने तात्काळ कामावर घेणे कमप्राप्त होते
पण तसे न करता सदर कर्मचारी यांना पोस्टाद्वारे कामावरुन कमी करण्याचे नोटीस पाठवून देऊन आपल्या नगरपंचायतीने त्यांच्याबद्दल असणारी द्वेशाची भावना दाखवून दिली आहे .त्यामुळे सदर महिलांच्या वारसांना तात्काळ कामावर घेण्यात यावे त्याशिवाय सदर महिलांना निवृत्त करण्यात येऊ नये असा सर्वसाधारण सभेत ठराव देखील घेण्यात आलेला आहे.
त्यामुळे जो पर्यत आपल्या कार्यालया कडुन संबंधित सर्व महिला कर्मचारी यांच्या वारसांना तात्काळ कामावर घेण्यात येत नाही तो पर्यत कर्जत नगरपंचायत कार्यालयात जाहिर धरणे आंदोलन, जागर गोंधळ आंदोलन, नगरपंचायत टाळे ठोक आंदोलन, अशा विविध स्वरूपाचे आंदोलन दिनांक 2/4/2025 पासुन कर्जत नगरपंचायत कार्यालयात धरणे आंदोलन करण्याचा इशारा कर्जत नगरपंचायत चे नगरसेवक भास्कर भैलुमे यांनी दिला आहे या निवेदनावर पाणीपुरवठा सभापती भाऊसाहेब भाऊसाहेब तोरडमल नगरसेवक रविंद्र सुपेकर यांच्या सह्या आहेत.