राशीनमध्ये महात्मा फुले चौकाचे सुशोभीकरण व स्मारक उभारण्याची मागणी

(जावेद काजी राशीन प्रतिनिधी) :- राशीन येथील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले चौक येथे सर्कल होऊन चौकाचे सुशोभीकरण तसेच महात्मा फुले यांचे स्मारक उभारण्यात यावे अशा मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे.
राज्यमार्ग 54 व राज्यमार्ग 68 दरम्यान राशीन येथील महात्मा फुले चौक येथे स्कॉस होतो. याठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून झालेल्या सर्वेक्षणानुसार रोडचे काम करून याठिकाणी सर्कल करुन महात्मा फुलेंचे स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले फाउंडेशन च्या वतीने करण्यात आली आहे.
राशीन ग्रामपंचायत च्या ठरावानुसार 2014 सालापासून करमाळा चौकाचे महात्मा फुले चौक असे नामकरण करण्यात आलेले असून बांधकाम विभागाच्या नकाशावर तसा उल्लेख करण्यात यावा अशा प्रकारची मागणी देखील या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
सार्वजनिक बांधकामाच्या सर्वेक्षणा नुसार या रोडचे काम पूर्ण करण्यात यावे व येथील महात्मा फुले चौकाचे सुशोभीकरण करून महात्मा फुले यांचे स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली असली तरी चौकाचे नियोजन न झाल्यास समाज्याच्या उद्रेकास शासन जबाबदार असेल अशी स्पष्ट शब्दात ताकीद अध्यक्ष कुंडलिक सायकर यांनी दिली.
यावेळी बापूराव धोंडे, माऊली सायकर, डॉ. विलास राऊत, श्रीकांत सायकर, अतुल राऊत, पवन जांभळकर, कैलास राऊत,एकनाथ धोंडे, सुनील जाधव, राजेंद्र राऊत, सतीश झगडे, शिवकुमार सायकर, रुद्रा राऊत, सागर गदादे, विशाल राऊत, अंकुश बनसोडे, दीपक बेलेकर, मिलींद राऊत, रमेश सायकर,विठ्ठल सायकर इ. निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.