ब्रेकिंग
यशवंत प्रज्ञाशोध परीक्षेत जितेश बचाटेचा उज्ज्वल यशाचा ठसा

Samrudhakarjat
4
0
1
0
8
3
कर्जत – यशवंत प्रज्ञाशोध परीक्षा 2024-25 मध्ये महात्मा गांधी प्राथमिक विद्यालयाच्या इयत्ता चौथीतील विद्यार्थी जितेश शंकर बचाटे याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याने विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावत तालुक्यात तिसरा क्रमांक मिळवला असून, आपल्या प्रगतीची घोडदौड कायम राखली आहे.
जितेशच्या या यशामागे विद्यालयाचे प्राचार्य राजकुमार चौरे, मोरे मॅडम, तसेच गुरू कोचिंगच्या सुषमा तिरंबके यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल विद्यालय, शिक्षक, पालक आणि समाजाच्या विविध स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
या उज्ज्वल यशाबद्दल जितेशचे अभिनंदन करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.