प्रशासकाच्या गलथान कारभारामुळे राशिनकरांचे आरोग्य धोक्यात : शामभाऊ कानगुडे

राशिन(प्रतिनिधी): जावेद काझी. गेल्या अनेक महिन्यापासून स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत निवडणुका पंचवार्षिक मुदत संपून लांबणीवर गेल्यामुळे राशीन ग्रामपंचायतीचा संपूर्ण कारभार प्रशासकाकडे गेल्यामुळे व प्रशासकाच्या दुर्लक्षितपणामुळे राशीनची जनता व्हेंटिलेटरवर दिसत असून पाणी व कचऱ्याचे योग्य नियोजन प्रशासकाकडून व ग्रामविकास अधिकाऱ्याकडून होताना दिसत नसल्यामुळे मा.सभापती/पै.शाम कानगुडे यांच्यामते
राशीन च्या जनतेला मैलामिश्रित पाणी व दुर्गंधी युक्त सडलेला कचऱ्याचा सामना गेल्या अनेक दिवसापासून करावा लागत असून राशिन ग्रामपंचायत ची प्रशासकीय यंत्रणा यास कारणीभूत असून राशीनच्या जनतेचे आरोग्य धोक्यात आणण्याचे काम प्रशासक करीत आहेत. मागील तीन महिने पाण्याचा मोटार बिघाड कारण सांगून जनतेला पाण्यापासून वंचित ठेवले कसेबसे मोटार बिघाड दुरुस्त करून झाल्यावर राशीनकरांना मैलामिश्रित पाणी, व दुर्गंधीयुक्त कचऱ्याच्या सानिध्यात ठेवले आसून प्रशासकीय कारभार असल्यामुळे ग्रामविकास अधिकारी व प्रशासक यांचे लक्ष फक्त चिरीमिरीवर
असल्याचे दिसत असून जनतेच्या रोजच्या दैनंदिन मूलभूत गरजांचा विसर प्रशासकांना पडला आहे असे वाटत आहे. ठरलेल्या वेळेवर उपस्थित न राहणे, कामगारांकडून कचऱ्याचे व पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करून न घेणे, मैला मिश्रित पिण्याची व दुर्गंधीयुक्त कचऱ्याची ग्रामस्थांची वारंवार येणारी समस्या समजून न घेणे, ग्रामपंचायत कार्यालयात वेळेवरउपस्थित न राहणे, प्रशासकाच्या कारणास्तव किरकोळ कामासाठी नागरिकांना वारंवार ग्रामपंचायत कार्यालय कडे हेलपाटे मारण्यास लावणे, अश अनेक समस्या बाबत गटविकास अधिकारी ,सी.ई.ओ.यांनी गांभीर्य पूर्वक लक्ष घालून राशीन ग्रामस्थांच्या
दैनंदिन मूलभूत गरजा आरोग्याच्या दृष्टीने धोक्यात न ठेवता तात्काळ सुरळीत पूर्ण कराव्यात अन्यथा ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन राशीन ग्रामपंचायत कार्यालयापुढे केले जाईल. असा जहरी इशारा कर्जत जामखेड मतदार संघाचे नेते/माजी .सभापती/महाराष्ट्र चॅम्पियन पै. शाम भाऊ कानगुडे व ग्रामस्थ यांनी दिला आहे.