pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

अहिल्यानगर जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी सबाजीराव गायकवाड उपाध्यक्षपदी अल्लाउद्दीन काझी यांची निवड.

Samrudhakarjat
4 6 5 9 8 5

राशील (प्रतिनिधी )जावेद काझी.आहिल्यानगर जिल्हा पतसंस्था फेडरेशन च्या नवनियुक्त संचालक मंडळ नियुक्तीची आज निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची बिनविरोध निवडणूक पार पडली यामध्ये

चेअरमन पदी सर्वानुमते पुनश्च एकदा माननीय सबाजीराव गायकवाड व व्हाईस चेअरमन पदी ज्येष्ठ नेते माननीय अल्लाउद्दीन एस काझी साहेब यांची सर्वानुमते बिनविरोध सार्थ निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी संचालक सर्वश्री अँड.रवी काका बोरावके, कोपरगाव अशोक मामा थोरे, श्रीरामपूर शिवाजी आप्पा कपाळे, राहुरी विठ्ठल पांडुरंग पा. अभंग,

नेवासा धनंजय गाडेकर, राहता प्रकाश राव सदाफुले, जामखेड ज्योतीताई गोलेकर, खर्डा व प्रशांतराव गायकवाड, पारनेर आदी नुतन संचालक मंडळ उपस्थित होते, यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून पालवे साहेब यांनी कामकाज पाहिले व संस्थेचे सचिव अशोक वाघमारे व वसुली अधिकारी मुबारक शेख व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker