Advertisement
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगराजकिय

कर्जत व्यापारी असोसिएशनच्या मासिक मिटिंगत वटपौर्णिमा उत्सव, नूतन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा सत्कार सोहळा उत्साहात.

Samrudhakarjat
4 1 2 9 1 2

कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत व्यापारी असोसिएशनच्या मासिक मिटिंगसह वटपौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधून नव्याने निवडून आलेल्या नगराध्यक्ष रोहिणी घुले व उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे यांचा भव्य सत्कार समारंभ नुकताच दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विभीषण खोसे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात राम ढेरे यांनी उपस्थितांचे स्वागत करून केली. यानंतर असोसिएशनचे सचिव प्रसाद शहा यांनी प्रास्ताविक करत असोसिएशनच्या कामाचा आढावा सादर केला. त्यांनी वटपौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने सर्व कार्यकारिणी सदस्य व त्यांच्या धर्मपत्नींना शुभेच्छा देऊन महिलांच्या कार्याबद्दल आभार मानले.

या विशेष प्रसंगी नूतन नगराध्यक्ष रोहिणी घुले व युवा नेते सचिन (भैय्या) घुले पाटील यांचा सत्कार असोसिएशनचे उपाध्यक्ष महावीर बोरा यांनी केला. उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे व त्यांच्या पत्नी सौ. पूजा मेहेत्रे यांचा सत्कार अध्यक्ष विभीषण खोसे व त्यांच्या पत्नी सौ. संगीता खोसे यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमात व्यापारी असोसिएशनच्या वतीने नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांना निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये असोसिएशनच्या कामकाजासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देणे, व्यापाऱ्यांसाठी संयुक्त गाळे उपलब्ध करणे, तसेच शहरातील पार्किंग व स्वच्छतागृहांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशा विविध मागण्यांचा समावेश होता.

या बैठकीत असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये अध्यक्ष विभीषण खोसे, उपाध्यक्ष महावीर बोरा, सचिव प्रसाद शहा, खजिनदार संतोष भंडारी, संजय काकडे, अर्जुन भोज, राम ढेरे, नितीन देशमुख, सुरेश नहार, विशाल छाजेड, गणेश तोरडमल, किशोर बोथरा, अनिल भैलुमें, श्रीकांत तोरडमल, अनिल भोज, उपमन्यू शिंदे, अतुल कुलथे, सचिन कुलथे, योगेश भापकर, यांचा सहभाग होता.

महिला सदस्यांमध्ये सौ. संगीता खोसे, चंदनबाला बोरा, हर्षा शहा, सोनाली भंडारी, शोभा शिंदे, मंदा देशमुख, प्राची भापकर, स्मिता भोज शोभा भैलुमें, अश्विनी तोरडमल, अनिता ढेरे, भाग्यश्री कुलथे, सुनिता काकडे, प्रियंका बोथरा, पूजा मेहेत्रे, सोनाली कुलथे, शारदा तोरडमल आदींची उपस्थिती उल्लेखनीय ठरली.

कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली होती. ही व्यवस्था अध्यक्ष विभीषण खोसे यांच्या वतीने करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या शेवटी उपाध्यक्ष महावीर बोरा यांनी उपस्थितांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.

हा सोहळा व्यापारी संघटनेच्या संघटनबळाचे व सामाजिक जाणीवेचे प्रतीक ठरला, अशी सर्वत्र चर्चा होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker