Advertisement
ब्रेकिंग

राशिन ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी गुरव त्यांच्या दुर्लक्षितते मुळे मोठा अपघात होण्याची शक्यता तसेच अनेक कामे प्रलंबित.

Samrudhakarjat
4 0 1 9 3 7

राशीन( प्रतिनिधी) जावेद काझी :- राशीन येथील राजे भोसले शॉपिंग सेंटर समोरून जाणारा जुना कुंभारगाव रस्ता हा दोन्ही राज्य मार्गाला जोडणारा असल्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात बघावयास मिळत असते गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्यावरील गायकवाड चहाचे दुकान समोरील व लहूनगर येथील चार फूट खोलीचे दोन चेंबर अक्षरशा फुटलेले असून हा चेंबर रस्त्याच्या मध्यभागी असल्यामुळे वाहतुकीस अडथळा येत असून मोठा अपघात होण्याची शक्यता ना करता येत नाही. याकडे ग्रामविकास अधिकारी मनोज गुरव यांचे लक्ष नसल्यामुळे अनुचित प्रकार घडू शकतो तरी लवकरात लवकर या कामाकडे लक्ष देऊन चेंबरचे बांधकाम करून मजबूत झाकण बसवून होणारा अनर्थ टाळावा अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य अशोक जंजिरे, गुलाब धांडे, सोनू गायकवाड, मोहसीन काझी, इतर ग्रामस्थांकडून होत आहे

तसेच वार्ड क्रमांक दोन मधील सर्वे वस्तीवरील पिण्याच्या पाण्याच्या पाईपचे नुकसान दौंड उस्मानाबाद रस्त्याच्या चाललेल्या खोदकामामुळे झालेले असून या संबंधित संतोष सरोदे यांनी झालेल्या नुकसानाची माहिती फोन द्वारे भीमराव साळवे यांना देऊन देखील अद्याप काहीच सूचना ग्रामपंचायत कडून संबंधित विभागाला व ठेकेदाराला गेल्या नसून पिण्याच्या पाण्याच्या ऐन उन्हाळ्यात तेथील नागरिकांची भटकंती होऊ नये म्हणून योग्य पाठपुरा करून संबंधित ठेकेदारास पाण्याच्या पाईपलाईनचे नुकसान होणार नाही या संदर्भात सूचना द्यावेत. 

तसेच मातंग वस्तीतील लहू नगर येथील सार्वजनिक शौचालयासाठी १५ वित्त आयोगातून पाच लाखाचा निधी मंजूर असून तसेच 26 मार्च अंतिम मुदत संपली असून संबंधित ठेकेदाराकडून अद्याप काम झालेले नसल्यामुळे लहू नगर मधील महिलांचा सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न सुटलेला नाही तो त्वरित सोडावावा राशींन ग्रामपंचायत संबंधित अशा अनेक समस्या व कामे रेंगाळत पडल्यामुळे ग्राम विकास अधिकारी गुरव पाठपुरावा करून मार्गी लावावा, सरपंच नीलम साळवे तसेच संबंधित ग्रामपंचायत सदस्य यांनी लक्ष घालून कामाची पूर्तता करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

4/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker