ब्रेकिंग
श्रीमती राधिका भालचंद्र मोरे ऊर्फ काकी यांचे दुःखद निधन

Samrudhakarjat
4
0
1
7
3
3
खेड – खेड येथील प्रतिष्ठित मोरे कुटुंबातील व माजी सभापती हेमंत मोरे तसेच आयडीएफसी बँकेचे जनरल मॅनेजर विकास मोरे यांच्या मातोश्री श्रीमती राधिका भालचंद्र मोरे ऊर्फ काकी यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने मोरे कुटुंबियांवर तसेच परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.
अंत्यविधी आज सायंकाळी सहा वाजता खेड स्मशानभूमीत (भीमा तीर) होणार आहे. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी अनेक मान्यवर, नातेवाईक आणि ग्रामस्थ उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.श्रीमती राधिका मोरे ऊर्फ काकी यांनी आपल्या समर्पित आणि कर्तव्यनिष्ठ जीवनातून समाजात एक आदर्श निर्माण केला होता. त्यांच्या आठवणी सदैव प्रेरणादायी राहतील.