न्यू गुरूकुल इंग्लिश स्कूलमध्ये कै. भगवंतराव बळवंतराव लांगोरे यांच्या जयंतीनिमित्त वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

कर्जत : आज दि. १२ एप्रिल रोजी न्यू गुरूकुल इंग्लिश स्कूलमध्ये कै. भगवंतराव बळवंतराव लांगोरे (अप्पा) यांच्या स्मरणार्थ वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजेंद्र शिंदे साहेब (सी.इ.ओ. पी. आर. एम. सॉफ्ट सोल्युशन प्रा. ली. पुणे ), रमेश कासार ( अकाऊंट ऑफिसर, जि.प. अहिल्यानगर) आणि कापसे टी . व्ही.( पी. आर. एम. सॉफ्ट सोल्युशन प्रा. ली. पुणे )
अध्यक्ष श्री. संभाजी लांगोरेसाहेब (अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. अहमदनगर) हे होते. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करुन कार्यक्रम सुरू झाला. विद्यार्थिनींनी स्वागत गीत गाऊन पाहुण्यांचे शब्द सुमनांनी स्वागत केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुलशी मलकरणिकर यांनी केले. तसेच प्रास्ताविक विशाल थोरात यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी बोलताना राजेंद्र शिंदे साहेब यांनी विद्यार्थ्यांना चांगला विद्यार्थी कसा घडतो यावर मार्गदर्शन केले. तसेच रमेश कासार यांनी ही मुलांना प्रोत्साहन दिले.
तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष संभाजी लांगोरेसाहेब यांनी सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धेचे महत्व सांगितले आणि विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सर्व स्पर्धक आणि खेळाडू विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रके , सुवर्ण पदके, कास्य पदके आणि स्मृतिचिन्हे देऊन गौरविण्यात आले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे अभिनंदन,संस्थेचे मार्गदर्शक संभाजी लांगोरेसाहेब (अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. अहमदनगर) , किरणजी नाईक (समन्वयक ) , शिवाजी पाटील (मुख्याध्यापक), राजेंद्रकुमार काळे (पर्यवेक्षक) आणि सर्व शिक्षकवृंद यांनी केले आणि सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शेवटी आभार प्रदर्शन मुख्याध्यापक शिवाजी पाटील यांनी केले आणि आणि कार्यक्रम संपन्न झाला.